सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे काय होणार याची चर्चा सुरु असतानाच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे अशा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागणीला त्यांनी होकार दिल्याचे म्हटले जात आहे.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया
devendra fadnavis and sunetra pawar
| Updated on: Jan 30, 2026 | 9:05 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु आहे. उद्या राष्ट्रवादी पक्षाची सकाळी ११ वाजता गटनेते पदाची निवड करण्यासाठी बैठक होत आहे. या बैठकीत पक्षाचा नेत्याची निवड केली जाणार आहे. तसेच अजितदादा पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदासाठी मंजूरी मिळाल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

कुठलाही निर्णय घ्यायचा असेल त्याला आमचा पाठींबा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की अजितदादांचे कुटुंब असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील त्यांना आमचे समर्थन असेल. राष्ट्रवादीच्या निर्णयाला भाजपा पक्ष आणि सरकारचा पूर्ण पाठींबा असेल, राष्ट्रवादीचे नेते माझ्याशी दोन वेळा ते चर्चा करुन ते गेले आहेत. या चर्चेत त्यांनी त्यांची काय कार्य पद्धती आहे  ? काय-काय ऑप्शन्स आहेत ? यासंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे. मात्र, अंतिम निर्णय जो काही असेल त्याचा निर्णय तो पक्ष घेईल या संदर्भात मी बोलणे योग्य होणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्प कोण सादर करणार ?

अर्थसंकल्पाची सगळी तयारी अजितदादांनीच केली होती. आता उद्या त्यात मी स्वत: त्यात लक्ष घालून अर्थ संकल्पाच्या प्रोसेस आहेत त्या पूर्ण करणार आहे, त्यानंतर आम्ही इव्हेन्च्युअली ठरवू कोणी अर्थसंकल्प सादर करायचा असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महापौर पदाच्या निवडणूका

महापौराच्या निवडणूका संदर्भात महायुतीच्या त्या-त्या पक्षांची चर्चा झाली आहे. मुंबई किंवा इतर शहरातील महापौरासंदर्भात जी काही नावे आली आहेत. त्या नावा संदर्भात उद्या परवा चर्चा केली जाईल. त्यात अंतिम नावे ठरली जातील. महानगराचे अध्यक्ष, आमदार योग्य तो निर्णय घेतील. नागपूरच्या महापौर संदर्भात ओव्हरऑल चर्चा झाली आहे त्या- त्या ठिकाणे प्रमुखांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.