Mukesh Ambani | मुंबई, महाराष्ट्र, देश-विदेश, कुठेही…, सुप्रीम कोर्टाचा मुकेश अंबानी यांच्याबद्दल मोठा निर्णय

| Updated on: Feb 28, 2023 | 11:03 PM

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबाविषयी विषयी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेबद्दल महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

Mukesh Ambani | मुंबई, महाराष्ट्र, देश-विदेश, कुठेही..., सुप्रीम कोर्टाचा मुकेश अंबानी यांच्याबद्दल मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबाविषयी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जगभरात Z+ सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. याचाच अर्थ सुप्रीम कोर्टाकडून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतच नाही तर देशभरात आणि परदेशातही Z+ सुरक्षा पुरवण्याचे आदेश देण्यात आला आहे. अंबानी कुटुंबासाठी हा मोठा, महत्त्वाचा आणि अतिशय दिलासादायक असा निर्णय आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याची बातमी समोर आली होती. याशिवाय मुकेश अंबानी यांचं घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून देण्यात येते. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात जास्त श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. याशिवाय जगातील सर्वात जास्त श्रीमंत उद्योगपतींच्या यादीतही त्यांचा चांगला क्रमांक लागतो. अंबानी कुटुंब हे देशाचा एक अभिमान आहे. अंबानी यांनी अनेक क्षेत्रांमध्ये मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय दिला आहे.

सुरक्षेचा खर्च अंबानी यांनाच करावा लागणार

सुप्रीम कोर्टाने अंबानी कुटुंबियांच्या सुरक्षेबद्दल निर्णय देताना एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे. अंबानी कुटुंबियांना देशभरासोबतच परदेशातही Z+ सुरक्षा सरकारकडून पुरवली जाणार असली तरी या सुरक्षेचा सर्व खर्च त्यांनाच भरावा लागणार आहे. कारण कोर्टानेच तसे निर्देश दिले आहेत. सुरक्षेचा सर्व खर्च अंबानी कुटुंबियांना करावा लागणार, असं सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालाच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अर्थात अंबानी यांच्यासाठी खर्चाचा विषय नाही, पण सरकारकडून सुरक्षा मिळणं ही महत्त्वाची गोष्ट आहे.