Ambani Family Driver Salary: अंबानी यांच्या ड्रायव्हरची चांदी, पोरांचं परदेशात शिक्षण, लाखो रुपये पगार आणि….

आपल्या महागड्या आवडींमुळे नेहमीच नीता अंबानी चर्चेत असतात. ज्वेलरी, हँडबॅग्सपासून ड्रेस आणि फूटवियर आदी सर्वांची किंमत लाखोंच्या घरात आहे. अब्जाधीश असलेल्या नीता अंबानी यांच्या स्टाफची सॅलरीही लाखोंच्या घरात आहे.

Ambani Family Driver Salary: अंबानी यांच्या ड्रायव्हरची चांदी, पोरांचं परदेशात शिक्षण, लाखो रुपये पगार आणि....
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 6:06 PM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब रॉयल आणि लक्झरी लाइफ जगतंय. नीता अंबानी यांच्याकडे तर कारचं प्रचंड कलेक्शन आहे. यावरून त्यांना महागड्या कार खरेदी करण्याची आवड असल्याचं दिसून येतं. एका रिपोर्टनुसार अंबानी कुटुंबाकडे 500 गाड्या आहेत. अंबानी कुटुंबाच्या कार ड्रायव्हर्सना अत्यंत कडक ट्रेनिंगला सामोरे जावं लागतं. ही अवघड ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतरच त्यांना अंबानी कुटुंबात ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळते. त्यामुळे अंबानी कुटुंबातील ड्रायव्हर्सचा पगार किती असेल? असा प्रश्नच सर्वांनाच पडला असेल. जाणून घेऊया त्याविषयीच.

स्टाफची मुलं परदेशात शिकतात

अंबानी कुटुंबात काम करणाऱ्या स्टाफची कमाई लाखांच्या घरात आहे. या स्टाफची पगाराशिवाय राहणे आणि खाण्याचीही व्यवस्था केली जाते. तसेच विमा आणि शैक्षणिक भत्ताही दिला जातो. मीडिया रिपोर्ट्स नुसार, नीता अंबानी यांच्या ड्रायव्हरला दर महिन्याला दोन लाख पगार मिळतो. म्हणजेच नीता अंबानी यांच्या ड्रायव्हरला वर्षाला 24 लाख रुपये पगार मिळतो. विशेष म्हणजे या सर्व स्टाफची मुलं परदेशात शिकतात. असं असलं तरी अंबानी कुटुंबात नोकरी मिळणं इतकं सोप्पं नाहीये. अंबानींच्या घरी काम करायचे असेल तर कंपनीने दिलेली टेस्ट पास करावी लागते. ड्रायव्हरची निवड करतानाही तो मार्गात येणाऱ्या अडथळ्यातून कसा मार्ग काढतो हे सुद्धा पाहिलं जातं. त्यानंतरच त्यांची नियुक्ती केली जाते.

हे सुद्धा वाचा

दिवसाची सुरुवात अशी

मीडिया रिपोर्ट नुसार, नीता अंबानी यांच्या चहाचीच किंमत लाखो रुपये आहे. नीता अंबानी यांच्या एक कप चहाची किंमत तीन लाख रुपये आहे. एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली होती. जपानमधील सर्वात जुना क्रॉकरी ब्रँड नोरिटेकच्या कपातून नीता अंबानी चहा घेतात. नोरिटेक क्रॉकरी हा सोन्याने मढवलेला असतो. याच्या 50 पीसच्या सेटची किंमत दीड कोटी रुपये आहे. म्हणजेच एका कपाची चहाची किंमत तीन लाख रुपये होते.

झेड प्लस सेक्युरीटी

आपल्या महागड्या आवडींमुळे नेहमीच नीता अंबानी चर्चेत असतात. ज्वेलरी, हँडबॅग्सपासून ड्रेस आणि फूटवियर आदी सर्वांची किंमत लाखोंच्या घरात आहे. अब्जाधीश असलेल्या नीता अंबानी यांच्या स्टाफची सॅलरीही लाखोंच्या घरात आहे. अंबानी कुटुंबाला सरकारने झेड प्लस सेक्युरीटी दिलेली आहे. अंबानी कुटुंब मुंबईच्या अँटालिया या भव्य बंगल्यात राहतात. हा जगातील सर्वात महागडा बंगला आहे. या आलिशान बंगल्यात अंबानी कुटुंबाच्या सेवेसाठी 600 नोकर दिवस रात्र काम करतात.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.