महापुरुषांचा अपमान होत असताना, हे गप्प का, सुषमा अंधारे यांचा सवाल

इथल्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे त्यांना दुर्लक्ष करायचे आहे.

महापुरुषांचा अपमान होत असताना, हे गप्प का, सुषमा अंधारे यांचा सवाल
सुषमा अंधारे
| Updated on: Dec 01, 2022 | 7:00 PM

मुंबई – शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्यपालांकडूनच नाही तर आणखी काही ठिकाणाहून महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडविणारी वक्तव्य येत आहेत. निव्वळ योगायोग नाही हे ठरवून महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडविण्याचा इथल्या महापुरुषांचं अवमान करण्याचा एक ठरवून केलेले षडयंत्र आहे. देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली हे सुरू असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. एकीकडे मोदींना रावण म्हटल्यानंतर तत्परतेने व्यक्त होणारे देवेंद्रजी मात्र इथल्या महापुरुषांचा अपमान होतो तेव्हा अळीमिळी चुपचिली करून बसतात. हा याचा ढळढळीत पुरावा आहे की महापुरुषांचा अवमान झाला तरी मी बोलणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

सातत्याने असे वक्तव्य येत आहेत याचा अर्थ असा आहे की इथल्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे त्यांना दुर्लक्ष करायचे आहे. गुलाबराव पाटील रेडा म्हणतात. सदाभाऊ खोत रेड्यांच्या अवलादी म्हणतात. ही जी काही वक्तव्य आहेत सवंग उथळ ही जी वक्तव्य आहेत महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारी आहेत, असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं.

राज ठाकरे हे फॅमिलीच्या विरोधातच ऍक्टिव्ह होत असतात. राज ठाकरे कधी भाजपच्या विरोधात ऍक्टिव्ह होत नसतात, असंही त्या म्हणाल्या. उद्या मी नागपूरमध्ये जात आहे. तिकडे एका लहान मुलीचे तुकडे तुकडे करून हत्या करण्यात आली आहे. महिलांसंदर्भात काही घटना या समोर येत आहेत. याकडे असे दिसून येत आहे की बताओ गृहमंत्री देवेंद्रजी हे नाकाम होत आहे.

पूजा चव्हाण यांची घटना समोर आली होती. ती फक्त राजकारणाकरिता आता त्याचा वापर करण्यात आला. भाजपच्या महिलांनी पूजा चव्हाणचं नाव फक्त राजकारणाकरिता वापरले. महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात महिला मंत्री आहेच नाही तर महिलांचे प्रश्न घेऊन जाणार कुठं जाणार, असा सवालही त्यांनी विचारला.