प्रश्न मुख्यमंत्र्यांना नको, उपमुख्यमंत्र्यानांच विचारा, अंधारेंची नेमका निशाणा कोणावर…

| Updated on: Dec 02, 2022 | 9:51 PM

सध्याच्या मंत्री मंडळातील निर्णय हे सगळे मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्रीच घेत असतात. सध्या कुणी काय करायचं आणि कुणी काय करायचं नाही.

प्रश्न मुख्यमंत्र्यांना नको, उपमुख्यमंत्र्यानांच विचारा, अंधारेंची नेमका निशाणा कोणावर...
Follow us on

मुंबईः शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळामध्ये एकही महिला मंत्री नसल्याने सातत्याने या सरकारवर टीका केली जात आहे. त्यामुळे आताही पत्रकारांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना हाच सवाल विचारल्यानंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मंत्री मंडळात महिला मंत्री का नाही हा सवाल आता मुख्यंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला.

सध्याच्या सरकारमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री हेच मुख्यमंत्र्यांचे सर्वाधिकार वापरत असतात असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांचे अधिकार उपमुख्यमंत्रीच वापरत असतात. तर त्यामुळे आपल्या राज्यातील उपमुख्यमंत्री हे पदच अधिक बलशाली झालं आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

सध्याच्या मंत्री मंडळातील निर्णय हे सगळे मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्रीच घेत असतात. सध्या कुणी काय करायचं आणि कुणी काय करायचं नाही.

हे मुख्यमंत्र्यांनी ठरवण्याआधीच उपमुख्यमंत्री ते ठरवत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री या पदापेक्षा उपमुख्यमंत्री हे पद अधिक बलशाली झाले आहे असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हिवाळी अधिवेशनामध्ये कोणता मुद्दा असणार या सवालावर त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न उपस्थि करून जिल्ह्याला आरोग्य सुविधा सुधारण्याबरोबरच गोंदिया जिल्ह्यात आणखी काय करता येईल त्याची चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.