शिंदे, फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, Karma Returns… सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट तुफान चर्चेत

मनोज जरांगे यांच्या कथित ५०० कोटी ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'कर्मा रिटर्न्स' म्हणत टोला लगावला आहे.

शिंदे, फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, Karma Returns... सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट तुफान चर्चेत
Devendra Fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 3:12 PM

मनोज जरांगे यांनी क्लिपचा बॉम्ब टाकल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा दावा या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही क्लिप केवळ जरांगे यांच्याकडेच नसून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्याकडेही असल्याचं समोर आलं आहे. शिवाय या क्लिपवरून भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमधून अंधारे यांनी कर्मा रिटर्न्स असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

सुषमा अंधारे यांची पोस्ट जशीच्या तशी –

दोन दिवसांपूर्वी अवघ्या दीड मिनिटांचा चंक मी ऐकला होता. आज संपूर्ण 30-32 मिनिटांची ऑडिओ ऐकली… बधिर झाल्यासारखं झालं… उदयनराजेंना सुद्धा आपण manipulate करू शकू असं वाटण्याइतकी मजल अत्यंत भिकार मानसिकतेच्या सुशिल कुलकर्णीला वाटते. हा कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना..? उदयनराजे किंवा उदयनराजेंचे समर्थक यावर अजिबात व्यक्त होत नाहीत ही कसली अपरिहार्यता? उदयनराजेंची ज्या पद्धतीची प्रतिमा सोशल मीडियावर समर्थकांकडून पुढे केली जाते त्यावरून तर अशी अटकळ की आतापर्यंत मराठे सुशील कुलकर्णीचा स्टुडिओ फोडून त्याला व्यवस्थितपणे चोपून काढतील असे वाटत होते.

Loading...

अत्यंत निर्लज्जपणे क्लिपमध्ये सुशील कुलकर्णी, अतुल भातखळकर ही माणसं उद्धव साहेबांच्याबाबत फेक नरेटीव कसे तयार करायचे यावर बेशरम चर्चा करतात. उद्धव साहेबांच्या सारख्या शांत सज्जन आणि सरळ मार्गी माणसाला बदनाम करण्यासाठी काय पद्धतीचे कट कारस्थान करता येऊ शकतील यावर विकट हास्य करत बेफिकीरपणे चर्चा करतात. किती चीड आणणारी गोष्ट आहे ही.

बाळासाहेब तुमचा बाप असेल माझा बाप बापूसाहेब असं सांगणारा सुशील कुलकर्णी मुळात सुरुवातीला हा सुशील रेणापूरकर आडनाव लावायचा. पण रेणापूरकर आडनावाने कुलकर्णी आडनावाचे प्रिव्हिलेज आपल्याला मिळू शकणार नाहीत, असं वाटल्यावर या महाधूर्त माणसाने रेणापुरकरचे कुलकर्णी करून घेतले.

वाढवण बंदर असेल किंवा अनेक प्रकल्पांच्या नावाखाली लोकांना विस्थापित करणे असेल यावर जो जो भूमिका घेईल तो देशविरोधी आहे आणि त्याला अमेरिकेकडून किंवा चायनाकडून फंडिंग मिळते हे नरेटीव आपण रुजवू शकतो. त्यासाठी आपण विविध वर्तमानपत्रांना मॅन्युपलेट करू शकतो, असं ज्या आत्मविश्वासाने कुलकर्णी सांगतो त्याच्याविरुद्ध वर्तमानपत्रांनी खरंतर रान उठवायला हवं होतं. कारण हा त्यांच्याही विश्वासार्हतेचा प्रश्न आहे.

यात माझ्या नावाचा उल्लेख आहे. एखादी स्त्री कुठल्याही हल्ल्याने नामोहरम होत नाही तेव्हा तिच्या चारित्र्यावर हल्ला करणे हा रामबाण इलाज इथल्या पुरुषी मानसिकतेचा असतो. त्यामुळे कुलकर्णी सारख्या हलकट प्रवृत्तींना तसे करणे सोपे वाटते. मात्र यातून एक गोष्ट निश्चित चांगली जाणवली ती ही की, इतर कुणाचेही मॅन्युप्युलेशन करू शकाल मात्र अंधारेंचं मॅन्युप्युलेशन करता येणं शक्य नाही. त्यामुळे कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतील तर जर अंधारे आपल्या म्हणण्यामध्ये, आपल्या कटामध्ये, आपल्या षडयंत्रमध्ये सामील होणार नसेल तर चारित्र्यहनन करायला आपलं काय जातंय?

सुशील कुलकर्णीने आतापर्यंत केलेले अनेक व्हिडिओ जर बघितले तर स्वतःच्या फसलेल्या करिअरबद्दलची भळभळती जखम घेऊन अतिशय टुकार दर्जाच्या पत्रकारितेच्या जीवावर भाजपचा पट्टा गळ्यात बांधलेला हा कुत्रा स्वतःला भाजप प्रवक्त्याचा गुरू म्हणवतो आणि भाजप प्रवक्ता सुद्धा पावाचा तुकडा खात कुलकर्णीजी माझे गुरू आहेत, असे अनेकांना बैठकीत सांगतो. थोडक्यात काय तर हे सगळेच आपले लायकी दाखवतात.

श्वेता शालिनी सारखी भाजपसाठी पर्सेप्शनवर काम करणारी बाई, बैठकीतल्या इतरांना सांगते. तुम्ही फेक नरेटीवर आतापर्यंत बोलत आहात. मात्र एक वास्तववादी गोष्ट आपण सांगितली पाहिजे, असं म्हणत जरांगेंना शिंदेंनी 500 कोटी रुपये दिले. ते 500 कोटी भाजपकडून घेऊन दिले. हे गंभीर भाष्य करते. पाचशे कोटी शिंदेंनी आणले की नाही यावर शिंदेंच्या गोटातून अनेक जण खल करतात. भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस आम्ही क्लिप तपासू असं म्हणतात. पण स्पष्टपणे आम्ही पैसे दिलेच नाही असं अजिबात म्हणत नाहीत.

नेमकं कोण कोणाचा गेम करतय..?

सुतराम संबंध नसताना जरांगेंच आंदोलन शरद पवार चालवतात किंवा ठाकरेंचा पाठबळ आहे हे आपण लोकांना पुन्हा पुन्हा सांगूया. वेगवेगळ्या युट्युब चॅनेलवरून ते खोटे पेरत राहूया. यावर राजरोसपणे रणनीती आखली जाते.

मराठ्यांनो एक गोष्ट लक्षात येते का, सुशील कुलकर्णी असेल अतुल भातखळकर असेल किंवा श्वेता शालिनी असेल किंवा अतुल लिमये असेल ही जी सो कॉल्ड वर्ण श्रेष्ठत्वाने पछाडलेली लोक आहेत, यांना यातून हे सुचित करायच आहे, मराठे भलेही शक्तिशाली असतील मात्र ते स्वतःचा मेंदू वापरू शकत नाहीत. आपण त्यांचा मेंदू भ्रमित करू शकतो आणि त्यांच्याच प्रणेत्याच्या विरोधात त्यांना सहज उभं करू शकतो.. दुर्दैवाने हे षडयंत्र रचण्यात ते काही अंशी यशस्वी ही झाले.

एका प्रचंड मोठ्या उभ्या राहिलेल्या आंदोलनाला सुपारीबाज लोक पैसे घेऊन बदनाम करायला पुढे येतात, हे साधारण 30 मिनिटाची ऑडिओ क्लिप ऐकल्यावर लक्षात येते. कुऱ्हाडीचा दांडा आणि गोतास काळ हे पुन्हा स्पष्ट होते.

किती गलिच्छ मानसिकता आहे. जरांगेंनी पैसे खाल्ले इथं पासून जरांगेच्या फार्म हाऊस वर बाया असायच्या इथपर्यंत बोलणाऱ्या बायका या मराठा समाजातून तयार केल्या जातात. कुठे फेडतील हे पाप? आक्रमण बाहेरून होतं, त्यावेळेला माणूस धैर्याने हल्ला परतवण्याची हिंमत ठेवतो मात्र उठाव जेव्हा आतल्या बाजूने होतो तेव्हा माणूस खचतो..

या ऑडिओ क्लिपवरून हेच स्पष्ट होतं की, पुष्यमित्रशृंगाची वृत्ती अजुनही संपलेली नाही… शिंदे, फडणवीस यांचा मुखवटा गळून त्यांचे भेसूर चेहरे समोर आले आहेत. बाबांनो आता तरी जागे व्हा. ऑडिओ क्लिप खरी आहे हे प्रत्येकाला लक्षात येते. त्यातला आवाज कुणाकुणाचा आहे हेही लक्षात येते. मात्र सत्ताधारी यांच्यासाठी ही ऑडिओ क्लिप खोटी ठरवायला क्षणाचाही वेळ लागणार नाही. तुम्ही मात्र हे षडयंत्र विसरून जायचं की लक्षात ठेवायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं…

पण शिंदे फडणवीस तुम्ही मात्र एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा..
karma returns…

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us