मुंबई किनाऱ्यावर तस्करी करणारे संशयित जहाज पकडले, भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई

मुंबई किनाऱ्याजवळ तस्करी करणारे संशयित जहाज पकडण्यात आले आहे. तटरक्षक दलाला मिळालेल्या गुप्त माहिती आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई किनाऱ्यावर तस्करी करणारे संशयित जहाज पकडले, भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई
Suspected smuggling vessel intercepted off Mumbai coast
| Updated on: Sep 11, 2026 | 9:35 PM

मुंबई किनाऱ्याजवळ संशयित तस्करी करणारे जहाज पकडण्यात आले आहे. तटरक्षक दलाला मिळालेल्या गुप्त माहिती आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी संशयित जहाजाजवळ जाऊन तपासणी करण्यात आली असता, या जहाजमध्ये बेकायदेशीर दारू आढळली आहे. बोटीवरील 6 जणांच्या क्रूला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

10 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2.10 वाजता ऑफशोअर ऑईल रिगजवळ संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती. त्यानंतर यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. रात्रीच्या वेळी संशयित जहाजाजवळ जाऊन तटरक्षक दलाने जहाजाची तपासणी आणि झडती घेतली असतात त्यात बेकायदेशीर दारू आढळली आहे. तसेच लपवून ठेवलेली अंदाजे 10 लाखांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. या जहाजावरील 6 जणांच्या क्रूला ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ चा अतिरेकी हल्ला समुद्रमार्गे झाला होता. तसेच १२ मार्च १९९३ रोजी मुंबई झालेले साखळी बॉम्बस्फोटासाठीची सामुग्री देखील समुद्री मार्गानेच आली होती. त्यामुळे सागरी किनाऱ्यावरील गस्त वाढवण्यात आली आहे. या जहाजामध्ये जरी काही संशयास्पद आढळलेले नसले तरी या जहाजांवरील  क्रुची चौकशी केली जात आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातील अजमल कसाब आणि त्याचे सहकारी पाकिस्तानातून जहाजाद्वारे मुंबईतील कुलाबा येथे उतरले होते. त्यानंतर त्यांनी शहरात बेछुट गोळीबार आणि पंचतारांकित हॉटेलातील लोकांना वेटीस धरले होते. तसेच १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटासाठी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शिखाडी  बंदरात आरडीएक्स उतरवण्यात आले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us