वीज स्वस्त! टाटा पॉवरची वीजदरात कपात, मुंबईकरांना मोठा दिलासा

वीज दरामध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून नवे दर जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर आता टाटा पावरकडून देखील आपले वीज दर कमी केले जाणार आहेत.

वीज स्वस्त! टाटा पॉवरची वीजदरात कपात, मुंबईकरांना मोठा दिलासा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 10:01 PM

मोठी बातमी समोर येत आहे. वीजदरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत.  महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून नवे वीज दर जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० साठीच्या बहु-वर्षीय दर (MYT) प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आता टाटा पॉवरकडून देखील वजी दरात कपात केली जाणार आहे, ज्याचा फायदा मुंबईतील तब्बल  ८ लाख ग्राहकांना होणार आहे, पाच वर्षांमध्ये २८ टक्के एवढी वीज दरात कपात होणार आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० साठीच्या बहु-वर्षीय दर (MYT) प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर, शहराच्या उपनगरीय भागात टाटा पॉवरचे देखील ०-१०० kWh आणि १००-३०० kWh श्रेणीतील दर कमी केले जाणार आहेत.

टाटा पॉवरचे सरासरी दर हळूहळू कमी होत जाणार आहेत, जे कि ९. १७ रुपये प्रति kWh वरून २०२९-३० या आर्थिक वर्षांमध्ये ६ . ६३ रुपये प्रति kWh पर्यंत कमी होतील, याचाच अर्थ पुढील पाच वर्षांत २८ टक्के कपात वीज दरामध्ये केली जाणार आहे.

सामान्य ग्राहकांना दिलासा 

दरम्यान वीज दरामध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून नवे दर जारी करण्यात आले आहेत. येत्या एक एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत.  याचा सर्वात मोठा फायदा हा सर्वसामान्य वीज ग्राहकांना होणार आहे. दरम्यान  महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० साठीच्या बहु-वर्षीय दर (MYT) प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आता टाटा पॉवरकडून देखील वीज दरात कपात करण्यात येणार आहे. येत्या एक एप्रिलपासून नवे वीज दर लागू होणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये 28 टक्क्यांपर्यंत वीज दरात कपात होऊ शकते.