
अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महारांजाचा प्रत्येक किल्ला हा आपल्याला प्रेरणा देतो. आपलं आयुष्य खूप कठीण आहे. आयुष्यात खूप संघर्ष आहे. पण हे संघर्षमय आयुष्य जगताना शिवरायांचे विचार, त्यांची प्रत्येक मोहीम, त्यांचं धाडसं, त्यांच्या अडचणी, संकटं आणि त्यांनी जिंकून मिळवलेले किल्ले हे जगण्याची नवी उमेद देतात. या किल्ल्यांसाठी शिवरायांच्या शेकडो मावळ्यांनी एकेकाळी प्राणाची आहुती दिली आहे. स्वराज्य उभं राहवं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातलं लहान मुल, महिला, शेतकरी, कष्टकरी सुखरुप राहावेत यासाठी ही झुंज होती. शिवराय इतके संवेदनशील होते की, मोहिमेसाठी निघालेल्या लष्कराला शेतकऱ्यांच्या पिकांमधून आपले घोडे चालवत नेवू नका, असा आदेश द्यायचे. पण त्यांनी निर्माण केलेल्या या स्वराज्यात काही गोष्टी अनपेक्षित घडत आहेत. लोकं आता याच शिवरायांच्या किल्ल्यांच्या इतिहासाला विसरत चालले आहेत का? शिवरायांचे विचार आणि संवदेशनशील स्वभावाला विसरत आहेत का? असा प्रश्न आता पडतो. विशाळगडचा इतिहास विशाळगडावर झालेल्या वादाआधी या किल्ल्याच्या...