टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट,एका आरोपीसंदर्भात मोठा खुलासा, काय घडले नेमके ?

टायगर श्रॉफ गोळीबारानंतर या घटनेची जबाबदारी समाजमाध्यमावरुन बिश्नोई गँगने स्वीकारली होती. या टोळीच्या एका गँगस्टरने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट,एका आरोपीसंदर्भात मोठा खुलासा, काय घडले नेमके ?
Tiger Shroff attack case
| Updated on: Nov 25, 2026 | 9:36 PM

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर जुहु येथे पुष्पा नरसी पार्कजवळ १८ ऑक्टोबर २०२६ रोजी तिघा जणांकडून गोळीबार करण्यात आला होता. रात्री सात वाजण्याच्या सुमारास टायगर श्रॉफ बीएमडब्ल्यू कारमधून फुटबॉल मैदानातून बाहेर पडत असतानाच घात लावून बसलेल्या तिघा जणांनी जवळून गोळीबार केला होता. यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला तर त्याचा चालक आणि एक रिक्षा चालक जखमी झाले होते. हल्लेखोर मोटार सायकलवरुन आले होते आणि पसारही झाले. या प्रकरणात देशाच्या विविध भागातून महिलांसह एकूण १४ आरोपींना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात आता कोर्टात एक मोठी घडामोड घडली आहे.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील एक आरोपी फूलसिंग उर्फ फुली हा अल्पवयीन असल्याचे कागदपत्रांआधारे कोर्टासमोर आले आहे   १८ ऑक्टोबर 2026 रोजी घडलेल्या घटनेच्या वेळी फूलसिंग हा १८ वर्षांखालील असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण आहे. आरोपीच्या वडिलांनी दाखल केलेल्या अर्जावर विशेष MCOCA न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी ही बाब स्पष्ट झाली आहे. या अल्पवयीन आरोपी  फूलसिंगची जन्मतारीख ३० नोव्हेंबर२००८ असल्याचे कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे. त्याच्या शाळेचे रेकॉर्ड, जन्म दाखला आणि अन्य कागदपत्रांची तपास अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे.

Loading...

आता पुढे काय ?

एक आरोपी अल्पवयीन सिद्ध झाला असल्याने त्याच्यावर आता  पुढील कारवाईसाठी मुंबईच्या बाल न्याय मंडळासमोर (JJB) त्याला हजर  करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. अल्पवयीन आरोपी  फूलसिंगविरोधातील पुढील सुनावणी आणि निर्णयप्रक्रिया बाल न्याय मंडळासमोर होणार आहे. अल्पवयीन आरोपीला कोर्टात फायदा होऊ शकतो. त्याच्या मानवीय दृष्टी कोणातून जास्त कलमे लावली जाणार नाहीत किंवा त्याला साधी जुजबी शिक्षा देऊन दया देखील दाखविली जाऊ शकते असे वकीलांचे म्हणणे आहे. मात्र, उर्वरित सज्ञान आरोपींवर मात्र, मोक्का खटल्यानूसार पुरावे समोर ते सिद्ध झाल्यानंतर कोर्ट कठोर शिक्षा फर्मावू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us