दुष्काळावर मात करण्यासाठी पवारांच्या मुख्यमंत्र्यांना टिप्स

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांर्भिय लक्षात घेवून राज्यसरकारने निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पाऊले उचलून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले असून त्यासोबत दुष्काळी संकटाशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही पाठवली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश […]

दुष्काळावर मात करण्यासाठी पवारांच्या मुख्यमंत्र्यांना टिप्स
Follow us on

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांर्भिय लक्षात घेवून राज्यसरकारने निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पाऊले उचलून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले असून त्यासोबत दुष्काळी संकटाशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही पाठवली आहे.

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पर्जन्यमान कमी झाल्याने ऐन हिवाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून दुष्काळाचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. विशेषत: परतीच्या पावसाने निराशा केल्याने खरिपाचे पीक हातचे गेले असून रब्बी पिकांची पेरणी संकटात आली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यांच्या टंचाईमुळे पशूधनही धोक्यात आले आहे त्यामुळे राज्यसरकारने यावर कृती कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सूचवलेल्या उपाययोजना

दुष्काळावर मात करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली असून, वैयक्तिक लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.