टीव्ही केबल बंद पडलाय? चिंता नको, या लिंकवर क्लिक करा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’च्या जाचक अटींविरोधात केबल व्यावसायिकांनी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. राज्यभरातील केबल नेटवर्क बंद झाले आहेत. संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत टीव्हीवर ब्लॅकआऊट असेल. टीव्ही पाहता येत नसेल तर तुम्हाला टीव्ही 9 मराठी http://tv9marathi.com/live-tv या लिंकवर क्लिक करुन विनाव्यत्यय पाहता येईल. ट्रायने नव्या वर्षांत ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे […]

टीव्ही केबल बंद पडलाय? चिंता नको, या लिंकवर क्लिक करा
Follow us on

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’च्या जाचक अटींविरोधात केबल व्यावसायिकांनी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. राज्यभरातील केबल नेटवर्क बंद झाले आहेत. संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत टीव्हीवर ब्लॅकआऊट असेल. टीव्ही पाहता येत नसेल तर तुम्हाला टीव्ही 9 मराठी http://tv9marathi.com/live-tv या लिंकवर क्लिक करुन विनाव्यत्यय पाहता येईल.

ट्रायने नव्या वर्षांत ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य बहाल करतानाच आणखीही जाचक अटी घातल्याचा केबल चालकांचा आरोप आहे.

काय आहे नवीन पद्धत?

ट्रायने सांगितले आहे की, ग्राहकांवर आपण विशिष्ट कोणते टीव्ही चॅनल पाहण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही. ग्राहकांना आता त्यांच्या आवडीनुसार चॅनल पाहण्याचे स्वातंत्र दिले आहे. मात्र यामध्ये ग्राहकांना त्यांनी निवडलेले टीव्ही चॅनल फक्त पाहता येणार आहे आणि ज्या चॅनलचे पैसे ग्राहकांनी दिलेले असतील. तसेच सर्व चॅनल्स वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध आहेत.  इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम गाईड (EPG) द्वारे टीव्हीवर प्रत्येक चॅनलची किंमत दिसेल. कोणताही डिस्ट्रीब्यूटर ब्रॉडकास्टकडून ठरवलेल्या किंमतीपेक्षा जास्त पैसे घेऊ शकत नाही.

प्रत्येक महिन्याला खर्च किती?

ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 100 चॅनलसाठी 130 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही 100 पेक्षा अधिक चॅनल बघत असाल तर नंतरच्या 25 चॅनेलसाठी अतिरिक्त 20 रुपये घेतले जातील. याशिवाय तुम्ही जो चॅनल निवडणार त्याची किंमत तुमच्या बीलमध्ये जोडली जाईल. TRAI च्या नुसार चॅनलची किंमत ही 1 ते 19 रुपयांमध्ये असेल.

मोफत चॅनलही मिळणार

TRAI ने सर्व सेवा प्रदान करणाऱ्यांना सुचना दिली आहे की, ग्राहकांना फ्री टु एअर (FTA) चॅनेल पूर्णपणे मोफत दाखवावे लागतील. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही पैस आकारायचे नाही. मात्र सर्व FTA चॅनेल देणे अनिवार्य नसून ते ग्राहकांवर अवलंबून आहे त्याना कोणते चॅनल पाहिजे आहेत. मात्र दुरदर्शनचे सर्व चॅनल्स दाखवणे अनिवार्य असेल.