Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : देशात 4 जूनला कुणाचं सरकार? नामवंत राजकीय विश्लेषकांचे वेगवेगळे दावे

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत देशात अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. अशातच दोन नामवंत राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळे दावे केलेत. कोणाच्या बाजूने केलेत जाणून घ्या.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : देशात 4 जूनला कुणाचं सरकार? नामवंत राजकीय विश्लेषकांचे वेगवेगळे दावे
| Updated on: May 22, 2024 | 10:21 PM

देशात 4 जूनला कुणाचं सरकार बनणार. यावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. देशातल्या दोन नामवंत राजकीय विश्लेषकांचं याबाबत दोन वेगवेगळी मतं आहेत. एक दावा आहे की यंदा एकटी भाजपच ३०० चा आकडा पार करेल. तर दुसऱ्या दाव्यानुसार यंदा भाजपसह एनडीए बहुमताच्या खाली राहू शकते. या दोन्ही दाव्यांना आधार काय आहेत.

निवडणुकांचा ५ टक्के पूर्ण झाल्यानंतर देशात कुणाचं सरकार येणार, यावरुन दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. एक दावा सांगतोय की भाजप आरामात तीनशेचा आकडा पार करेल, तर दुसरा दावा आहे की भाजप यंदा स्वबळावर बहुमताचा आकडा गाठू शकत नाही. एक दावा आहे की एनडीएचा आकडा 400 नाही पण हमखास 300 च्या पुढेच असणार., दुसरा दावा आहे की एनडीए मिळूनही बहुमत हे कट टू कट होण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ:-

543 पैकी 428 जागांवर मतदान पूर्ण झालंय. उरल्या आहेत 115 जागा. 25 मे आणि 1 जूनला उरलेल्या सहाव्या आणि सातव्या टप्प्याचं मतदान होईल आणि 4 जूनला देशानं कुणाला कौल दिला हे स्पष्ट होणाराय. 2019 ला पाचव्या टप्प्यानंतर 438 जागांवर मतदान पूर्ण झालं होतं., त्यावेळी कोण किती जागा जिंकलेलं, याची आकडेवारी पाहूयात. यापैकी भाजप 238, एनडीए 275, काँग्रेस 44 तर यूपीएनं 85 जागांवर विजय मिळवला होता.

यंदा मात्र दोन्ही बाजूनं आपल्यालाच कौल मिळण्याचा विश्वास व्यक्त होतोय. देशाच्या सत्तेत 80 लोकसभा जागांचं उत्तर प्रदेश महत्वाचं असलं, तरी यंदा बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या निकालाकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.