मुंबईतील वांद्रे परिसरात 24 तासात दोन अजगर सापडले!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात दोन अजगर सापडल्याने चांगलीच खळबळ माजली. अवघ्या 24 तासाच्या आत या परिसरात तब्बल 8 फुटाचे दोन अजगर सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास वांद्रे पूर्व परिसरात अजगर आढळून आला. हा अजगर मादी असून त्याची लांबी 7.5 फूट इतकी होती. तर वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पुलावर रविवारी रात्रीच्या […]

मुंबईतील वांद्रे परिसरात 24 तासात दोन अजगर सापडले!
Follow us on

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात दोन अजगर सापडल्याने चांगलीच खळबळ माजली. अवघ्या 24 तासाच्या आत या परिसरात तब्बल 8 फुटाचे दोन अजगर सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास वांद्रे पूर्व परिसरात अजगर आढळून आला. हा अजगर मादी असून त्याची लांबी 7.5 फूट इतकी होती. तर वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पुलावर रविवारी रात्रीच्या सुमारास दुसरा अजगर आढळून आला.

वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पुलावर अजगर असल्याची माहिती खेरवाडी पोलिसांना मिळाली होती. ज्यानंतर त्यांनी मानव अभ्यास संघ या संस्थेला याची माहिती दिली. स्थानिक सर्प मित्र अतुल कांबळी यांनी घटनास्थळी पोहोचून या अजगराला जीवनदान दिले.

तब्बल आठ फुटाचा हा अजगर रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वांद्रे पूर्व येथील रेल्वे पुलावर आढळून आला. जवळील मीठीनदीतून हा अजगर बाहेर आला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या रेल्वे पुलावर एक महिला काँस्टेबल खुर्चीवर बसलेली होती, तेव्हा हा अजगर तिच्या खुर्चीखाली येऊन बसला. तिथे उपस्थित दुसऱ्या काँस्टेबलच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी या महिलेला सावध केले, ज्यानंतर महिला काँस्टेबलने रस्त्याच्या दिशेने धाव घेतली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच काहीकाळ येथे वाहतूक कोंडीही झाली.

इथे रस्त्यावर या प्रकारे साप येण्याची ही काही पहिली घटना नाही, याआधीही अशा घटना येते घडल्या आहेत. अशाप्रकारे साप रस्त्यावर येण्याचं कारण वाढत काँक्रीटीकरण आणि मेट्रोचे काम करण्यासाठी केलेलं खोदकाम सांगितलं जात आहे. या मोठ्यामोठ्या मशीनींचा हादरा बसल्याने हे साप आपल्या बिळातून बाहेर आले असल्येचा अंदाज आहे.