उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांची युती; रामदास आठवले यांची प्रतिक्रिया काय?

| Updated on: Jan 24, 2023 | 11:10 PM

प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले. पण, भीमशक्ती आमच्यासोबत आहे, असा दावाही रामदास आठवले यांनी केला. त्यामुळं शिवशक्ती -भीमशक्ती असं ठाकरे-आंबेडकर यांच्या युतीला म्हणू नये. तर शिवशक्ती-वंचितशक्ती म्हणावं.

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांची युती; रामदास आठवले यांची प्रतिक्रिया काय?
रामदास आठवले
Follow us on

मुंबई : वंचित बहुजन विकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युती झाली. मुंबई महापालिकेत ते एकत्र निवडणूक लढविणार आहेत. यावर बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) म्हणाले, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकत्र आलेले आहेत. या युतीला भीमशक्ती-शिवशक्ती म्हणता येणार नाही. भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला होता. बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही त्यांच्यासोबत होतो. २०१२ मध्ये शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली होती.

शिवसेना, भाजप आणि आरपीआय एकत्र आली होती. त्यावेळी महायुती झाली होती. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे आता एकत्र आले आहेत. पण, त्याचा राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होणार नाही, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात कुणाचं चालू देणार नाही

भाजपची मोठी ताकद देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनाही मजबूत होत आहे. आमचा रिपब्लिकन पक्षही मजबूत आहे. आम्ही तिघेही एकत्र असल्यानं महाराष्ट्रात कुणाचं चालू देणार नाही, असंही रामदास आठवले यांनी ठणकावून सांगितलं.

शिवशक्ती-वंचितशक्ती म्हणावं

प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले. पण, भीमशक्ती आमच्यासोबत आहे, असा दावाही रामदास आठवले यांनी केला. त्यामुळं शिवशक्ती -भीमशक्ती असं ठाकरे-आंबेडकर यांच्या युतीला म्हणू नये. तर शिवशक्ती-वंचितशक्ती म्हणावं.

आम्हाला आव्हान देणे शक्य नाही

राजकारणात कोणीही कोणासोबत जावं. हा त्यांचा अधिकार आहे. आमची ताकद मोठी आहे. त्यामुळं आमच्या ताकदीला आव्हान देणं हे महाविकास आघाडीला शक्य नाही. त्यात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनाही शक्य नाही, असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.