AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर मी आतंकवादी आहे, उद्धव ठाकरे भर सभेत असं का म्हणाले?

मध्यावधी निवडणूक लागली तर आपले शिलेदार खासदार होईल. हे सरकार चालेल असं वाटत नाही. चालू नये असंच वाटतं असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यादरम्यान त्यांनी संविधान वाचवणं हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी असल्याचं ठाकरे म्हणाले.

...तर मी आतंकवादी आहे, उद्धव ठाकरे भर सभेत असं का म्हणाले?
Harish Malusare
Harish Malusare | Edited By: | Updated on: Jun 20, 2024 | 8:43 AM
Share

शिवसेना पक्षाच्या 58 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू आणि नितिश कुमार यांना सोबत घेत सत्ता स्थापन करण्यावरूनही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. आपल्या भाषणात बोलताना ठाकरे म्हणाले तर मग मी आतंकवादी आहे, ते असं का म्हणाले जाणून घ्या.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

काही संस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. काही युट्युबरनेही प्रचार केला. मिंधे बोलले शहरी नक्षलवाद. हुकूमशाही तोडाफोडा आणि लोकशाही वाचवा हा प्रचार नक्षलवाद वाटतो.लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. संविधान वाचवणं हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमचे बापजादे दिल्लीत बसले आहेत. मोदी शहा जे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. कार्यकर्त्यांच्या घरी ईडी सीबीआयला पाठवता. अमोलला पाडणारा गद्दार निर्लज्जपणे सांगतो माझ्याकडे पर्यायच नव्हता. नाही तर तुरुंगात गेलो असतो. तुम्ही दमदाट्या देऊन तुरुंगात टाकता. दहशत निर्माण करता हा तुमचा नक्षलवाद नाही का? हा तुमचा सरकारी नक्षलवाद नाही का. हा नक्षलवादच आहे. सत्तेचा दुरुपयोग करणं हा शहरी नक्षलवादापेक्षा भयानक आहे. लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे. तुम्ही खरे नक्षलवादी आहात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.

चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांच्याशी झालेली युती नैसर्गिक आहे का. मी म्हणतो भाजपमुक्त राम पाहिजे. तो मिळाला. नितीश कुमार म्हणाले होते, संघ मुक्त भारत. त्यांच्यासोबत मानाचं पान घेऊन बसले होते. मोदी चंद्राबाबूंना यूटर्न बाबू म्हणाले होते. चंद्राबाबू म्हणाले होते मोदींना अतिरेकी. मांझी म्हणाले होते राम काल्पनिक आहे. त्यांच्यासोबत हे बसले. अशा लोकांना घेऊन तुम्ही मला हिंदुत्व शिकवत आहात, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन