मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘या’ कारणासाठी मानले केंद्र सरकारचे आभार

| Updated on: Mar 23, 2021 | 5:30 PM

राज्यातील राजकिय घडामोडींमुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंध ताणलेले आहेत. Uddhav Thackeray COVID vaccination

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या कारणासाठी मानले केंद्र सरकारचे आभार
उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई: राज्यातील राजकिय घडामोडींमुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंध ताणलेले आहेत. या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. देशातील 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्याच प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली होती. केंद्रानं 45 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला 1 एप्रिलपासून सुरुवात होईल असा निर्णय जाहीर केला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. (Uddhav Thackeray thanks centre government taken decision for COVID vaccination for all those over 45 years of age)

मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्विट

मुख्यमंत्र्यांच्या मागणीला यश

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः 45 वर्षांवरील व्यक्ती कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी व्हिसी मध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.

महाराष्ट्रात 45 लाख लोकांना लसीकरण

सुरवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वलस्थानी होते. आतापर्यंत २२ मार्चच्या आकडेवारीनुसार राज्यात 45 लाख 91 हजार 401 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

प्रकाश जावडेकरांकडून लसीकरणाबाबत घोषणा

येत्या एक एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. 45 वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असं आवाहन जावडेकरांनी केलं. आतापर्यंत केवळ सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती.

संबंधित बातम्या

corona vaccination : तुम्हाला कोरोना लस आता मिळू शकते का? लस मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया

45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस, केंद्रीय कॅबिनेटची घोषणा

(Uddhav Thackeray thanks centre government taken decision for COVID vaccination for all those over 45 years of age)