प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा; शिक्षकांची भरती संवर्गनिहाय करावी; उदय सामंत यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या निर्बंधातून राज्याला मुक्त करत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वविट करुन माहिती सांगितली आहे.

प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा; शिक्षकांची भरती संवर्गनिहाय करावी; उदय सामंत यांनी दिली माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मंत्री उदय सामंत यांनी ट्वविट करुन माहिती दिली.
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 7:13 AM

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या निर्बंधातून राज्याला मुक्त करत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ट्वविट करुन माहिती सांगितली आहे. शासकीय पातळीवर निर्बंधमुक्त महाराष्ट्र केल्याबद्दल आणि शाळांच्या सुट्ट्यांचा निर्णयही आज जाहीर करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांना उदय सामंत आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करुन त्यांना धन्यवाद म्हटले आहे. तसेच शिक्षकांची भरती संवर्गनिहाय करावी हे धोरण 1 एप्रिल2022 लागू करण्याचे आदेश, देऊन मुख्यमंत्री उद्धवसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबरोबरच उदय सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये आणखी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या नाराजी पत्राबद्दल मला माहिती नाही मात्र अजून एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे राज्य सरकारने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. त्यामुळेही त्यांचे धन्यवाद मानण्यात आले आहेत. प्राध्यापक भरतीचा प्रश्न कित्येक वर्षे रेंगाळत पडला होता. या निर्णयामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील अनेक जागा भरल्या जाणार आहेत.

नागरिकांच्या मनातील इच्छा पूर्ण

राज्य निर्बंधमुक्त करण्याच्या निर्णयाबद्दल सर्वस्तरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देण्यात येत आहेतच त्याचबरोबर काही दिवसावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजाण हा सणही महाविकास आघाडी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असल्याने राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या मनातील इच्छा पूर्ण झाली असल्याचे ट्विट करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात गुढीपाडवा, आणि गुढीपाडव्याच्या शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमजानही यानिमित्ताने साजरे होणार आहेत. त्यामुळे हे सण साजरे होणार आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनातली इच्छा आज उद्धव ठाकरेंनी पूर्ण केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विरोधकांनाही टोला

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देता असताना उदय सामंत यांनी विरोधकांनाही टोला लगावला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, विरोधक काय बोलतात याकडे मला अजिबात बघायचं नाही, एखादं काम झालं की ते आमच्यामुळे झालं असं विरोधक तीन वर्षापासून सांगत आहेत असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला आहे.

चांगल्या पद्धतीने काम

ठाकरे सरकारने राज्याच्या हिताचे जे निर्णय घेतले आहेत ते नक्कीच चांगले निर्णय असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे सरकारच्या कार्यशैलीबद्दल बोलताना आपण चांगल्या पद्धतीने काम करतो आहोत असं सांगितले आहे. तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज कॅबिनेटमध्ये प्राध्यापक भरतीचाही मोठा आणि चांगला निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

अविश्वास ठरावाबद्दल इमरान खान म्हणतात, शेवटच्या क्षणापर्यंत मी लढणार; पण राजीनामा देणार नाही

Shivsena NCP : शिवसेनेच्या नेत्यांच्या डोळ्यात राष्ट्रवादी, शरद पवार का खुपतायत? 5 नेत्यांची ही 5 वक्तव्य बघा

ED Raid : फडणवीसांच्या विरोधात बोलल्यामुळेच ईडीची रेड, सुनेलाही धक्काबुक्की, सतीश उकेंच्या वडिलांचे गंभीर आरोप