Special Report : उद्धव ठाकरे यांचा ठाण्यातून एकनाथ शिंदे यांना इशारा; केव्हा घेणार सभेतून समाचार?

| Updated on: Jan 26, 2023 | 11:20 PM

जे सोडून गेले ते विकले गेले. मग, यांच्याकडं सोडून येणारे सचिन अहीर, सुषमा अंधारे, प्रियंका चतुर्वेदी हे दुसऱ्या पक्षातून शिवसेनेच्या ठाकरे गटात आले आहेत. ते काय विकले गेले नाहीत काय, असा सवालही म्हस्के यांनी विचारला.

Special Report : उद्धव ठाकरे यांचा ठाण्यातून एकनाथ शिंदे यांना इशारा; केव्हा घेणार सभेतून समाचार?
Follow us on

ठाणे : ठाण्यामधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिकास्त्र सोडलं. चार मिनिटांच्या भाषणातून त्यांनी शिंदे यांच्यावर तीक्ष्ण शब्दात वार केलेत. महाआरोग्य शिबिरानिमित्त उद्धव ठाकरे ठाण्यात आले होते. खासदार राजन विचारे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिराला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. या शिबिरातून विकाऊ आणि लांडगे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं.

उद्धव ठाकरे शिबिरात बोलताना म्हणाले, आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला आलो आहे. येत्या काही दिवसांत ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घेण्यासाठी येणार आहे.

काय भावाने विकले तुम्हाला माहीत आहे

जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते इकडे आहेत. बाकीचे विकाऊ होते ते विकले गेले. काय भावाने विकले ते तुम्हाला माहीत आहे.

प्रताप सरनाईक यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. पेट्या, खोके या गोष्टी सर्वसामान्यांना माहीत नव्हत्या. पण, जे खोके घेऊन थकले त्यांनी खोके म्हणजे काय त्यांचं पावित्र्य काय असते हे सांगतात. आतापर्यंत आम्हीपण तिथंच होतो. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहचविण्याचं काम अजूनही करतोय.

उरलेले मशाल पेटवतील काय?

निष्टेच्या पांघरूनाखाली जे काही लांडगे घुसले होते. यामुळं महाराष्ट्राची बदनामी झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. गेले ते जाऊ द्या. पण, जे अस्सल निखाऱ्यासारखे धगधगते शिवसैनिक शिवसेनेसोबत आहेत. ते आता मशाल पेटवतील, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

ते काय विकले गेले नाहीत

नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. जे सोडून गेले ते विकले गेले. मग, यांच्याकडं सोडून येणारे सचिन अहीर, सुषमा अंधारे, प्रियंका चतुर्वेदी हे दुसऱ्या पक्षातून शिवसेनेच्या ठाकरे गटात आले आहेत. ते काय विकले गेले नाहीत काय, असा सवालही म्हस्के यांनी विचारला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेच्या ठाकरे गटात येणारे काय पुण्यकर्म म्हणून येत आहेत का, असा सवालही नरेश म्हस्के यांनी केला.