Mumbai Local : ठाण्यातील लॉकडाऊन हटवला, आता लोकल रेल्वे धावणार की नाही?

| Updated on: Jun 03, 2021 | 5:30 PM

राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

Mumbai Local : ठाण्यातील लॉकडाऊन हटवला, आता लोकल रेल्वे धावणार की नाही?
Mumbai-Local
Follow us on

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. यानुसार आता ठाण्यातील लॉकडाऊन हटवण्यात आलाय. याशिवाय राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांमध्ये पूर्ण अनलॉक करण्यात येणार आहे. यावेळी वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल सुरु होणार का? या प्रश्नाचंही उत्तर दिलं. या घोषणा कोरोना संसर्गाच्या प्रमाणानुसार केल्या आहेत. त्यानुसार सध्या मुंबईतील लोकल सुरु होणार नाही. मात्र, पुढील आठवड्यात मुंबईतील कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यास लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली (Unlock declaration in Maharashtra what about Mumbai local service know all about it).

विजय वडेट्टीवार म्हणाले, “सध्याचा कोरोना संसर्गाचा दर पाहता मुंबईत लॉकडाऊन शिथील होणार नाही. त्यामुळे लगेच लोकल सेवा सुरु होणार नाही. सध्या कोठे किती कोरोना संसर्गाचा दर आहे त्यानुसार अनलॉकचा निर्णय घेण्यात आलाय. हे दर आजचे आहेत. जर पुढील आठवड्याचा संसर्ग दर कमी झाला मुंबईत लोकल सेवा सुरु होऊ शकेल.”

अशाप्रकारे तुर्तास तरी मुंबई लोकलबाबतच्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आगामी काळातच मुंबई लोकल सुरू करण्यावर निर्णय होऊ शकतो. मुंबई दुसऱ्या टप्प्यात आहे. मुंबईत आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होतील. सध्या मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच असेल, असंही नमूद करण्यात आलंय.

ठाणे पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा नसणार आहे. मात्र, बससेवा पूर्ण क्षमतेने सुरु राहणार आहे. या निर्णयांची 4 जूनपासून अंमलबजावणी होणार आहे. दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट बघून जिल्ह्याचे टप्पे बदलण्याचा निर्णय होईल.

महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यात जिथे 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन 25 टक्के बेड आत आहे, तिथं लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचं बंधन नाही. पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील.

विजय वड्डेटीवार नेमकं काय म्हणाले?

लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 लेव्हल ठरवल्या आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्याच्या आत असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील.

रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खासगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहेत. बस 100 टक्के क्षमतेने, इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील. त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील. आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असेल.

पहिल्या टप्पा – 18 जिल्हे
दुसरा टप्पा – 5 जिल्हे
तिसरा टप्पा – 10 जिल्हे
चौथ्या टप्पा – 2 जिल्हे

लेवल एकमध्ये येणारे जिल्हे

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर,धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ

अनलॉकचे 5 टप्पे कोणते?

  • पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
  • दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
  • तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
  • चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर
  • पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

हेही वाचा :

5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, 18 जिल्ह्यातून लॉकडाऊन उठवला, तुमचा जिल्ह्यातील लॉकडाऊन कधी उठणार?

Maharashtra Lockdown Update : महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात 5 टप्प्यात शिथीलता देणार

Maharashtra Coronavirus LIVE Update :राज्यात निर्बंध शिथिल, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, गडचिरोली अनलॉक : विजय वडेट्टीवार

व्हिडीओ पाहा :

Unlock declaration in Maharashtra what about Mumbai local service know all about it