Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट | शिवसेनेचं ठरलं, विधानसभा आणि लोकसभेत लढवणार ‘इतक्या’ जागा

| Updated on: Mar 26, 2023 | 12:20 AM

लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आणखी वर्षभराचा कालावधी आहे..पण शिवसेनेनं भाजपला जागा वाटपावरुन स्पष्ट शब्दात संदेश दिलाय

Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट | शिवसेनेचं ठरलं, विधानसभा आणि  लोकसभेत लढवणार  ‘इतक्या’ जागा
Follow us on

मुंबई : लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आणखी वर्षभराचा कालावधी आहे..पण शिवसेनेनं भाजपला जागा वाटपावरुन स्पष्ट शब्दात संदेश दिलाय. 2019च्या फॉर्म्युल्यानुसारच म्हणजेच विधानसभेत शिवसेना 126 जागा लढणार, असं गजानन किर्तीकर म्हणालेत.

संसदीय नेतेपदी निवड होताच, शिवसेनेच्या गजाजन किर्तीकरांची जागा वाटपावरुन थेट भाष्य केलंय. 2019मध्ये भाजप आणि शिवसेनेत जो फॉर्म्युला ठरला होता, त्या प्रमाणंच जागा वाटप होणार असं किर्तीकर म्हणालेत. आता 2019चा फॉर्म्युला पाहिला तर लोकसभा निवडणुकीत भाजपनं 26 जागा तर शिवसेनेनं 22 जागांवर उमेदवार दिले होते.

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं 162 भाजप आणि शिवसेनेनं 126 जागा लढल्या होत्या. त्यामुळं पुढच्या वर्षीही लोकसभा निवडणुकीसाठी 22 आणि विधानसभेत 162 जागा शिवसेना लढणार त्यात तडजोड नाही, असा इशाराच किर्तीकरांनी भाजपला दिलाय.

विशेष म्हणजे काही दिवसांआधीच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शिंदेंच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत 48 जागा देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केल्यानं बावनकुळेंनी घुमजाव केलं होतं.पण खासदार गजानन किर्तीकरांनी लोकसभेच्या 22 आणि विधानसभेच्या 126 जागा लढणार त्यात काहीही कमी होणार नाही, अशा शब्दात भाजपला संदेश दिलाय. तर टीव्हीवर फॉर्म्युला ठरत नाही, असं भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय.

एकनाथ शिंदेंकडे सध्या 40 शिवसेनेचे आणि अपक्ष 10 असे 50 आमदार आहेत. पण 2019च्या फॉर्म्युल्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते ठाम आहेत..अर्थात आणखी एक वर्ष बाकी आहे, तोपर्यंत दावे प्रतिदावे सुरुच राहतील.