उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांसोबत गेल्यानंतर काय घडलं?; रामदास आठवले म्हणतात, “महाविकास आघाडीत…”

| Updated on: Jan 28, 2023 | 9:14 PM

महाविकास आघाडीत धूसफूस सुरूच आहे. प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले. त्यानंतर आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेशी मी सहमत नाही. शरद पवार हे माझे चांगले मित्र आहेत.

उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांसोबत गेल्यानंतर काय घडलं?; रामदास आठवले म्हणतात, महाविकास आघाडीत...
रामदास आठवले
Follow us on

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) गेले असले तरी त्याला शिवशक्ती-भीमशक्ती युती म्हणता येणार नाही, असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केलं. शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात झाला होता. शिवसेना-भाजप आणि आठवले गट एकत्र होते. तो खरा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग होता. त्या काळात शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग यशस्वी झाला होता. उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांच्या एकत्रीकरणाला शिवशक्ती-वंचित शक्ती असं म्हणता येऊ शकेल. दे दोघे एकत्र आले असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काही फरक पडणार नाही, असंही आठवले यांनी सांगितलं.

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. माझी युती ही शिवसेनेसोबत आहे. महाविकास आघाडीसोबत नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत जायचं आहे की, शिवसेनेसोबत राहायचं आहे, हा प्रकाश आंबेडकर यांचा विषय आहे, असंही आठवले म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसोबत वैचारिक मतभेद असल्याचं म्हटलं. आम्ही कायमचे शत्रू नसल्याचंही त्यांनी म्हंटलं. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्र आलो. आत्मनिर्भर भारत करण्याची मोदी यांची भूमिका आहे.

…तर त्यांनी भाजपसोबत यावं

प्रकाश आंबेडकर यांना वाटत असेल की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती तोडावी आणि भाजपसोबत यावं. तर त्याला आमची काही हरकत नसल्याचंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं. राजकारणात यशस्वी व्हायचं असेल, तर प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसोबत आलं पाहिजे, असा सल्ला दिला.

रामदास आठवले यांनी सांगितलं की, महाविकास आघाडीत धूसफूस सुरूच आहे. प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले. त्यानंतर आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेशी मी सहमत नाही. शरद पवार हे माझे चांगले मित्र आहेत.

यासाठी शरद पवार यांचं सहकार्य

शरद पवार हे राजकीयदृष्ट्या नेहमी अॅक्टिव्ह राहतात. मराठवाडा नामांतराचा प्रश्न होता. तो सोडविण्यास शरद पवार यांचं सहकार्य मिळालं आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमिका ते मांडत आले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांना काय झालं माहीत नाही. संजय राऊत यांना ओळखत नाही म्हणतात. दुसरीकडं शरद पवार यांच्यावर टीका करतात. त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांना शिवसेनेबरोबर राहायचं आहे की, नाही, याबाबत मी साशंक असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हंटलं.