“मी जे बोलत होतो ते खरं होतं,” मुंबईकरांचे इतके कोटी वाचविले; आदित्य ठाकरे यांचा दावा काय?

| Updated on: Jan 20, 2023 | 10:27 PM

पुढं हे कंत्राटदार महापालिकेचं काय ऐकणार, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. यात व्हेरिएशनचा क्लॉज आहे का. याच उत्तर महापालिकेनं कुठंही दिलेलं नाही.

मी जे बोलत होतो ते खरं होतं, मुंबईकरांचे इतके कोटी वाचविले; आदित्य ठाकरे यांचा दावा काय?
आदित्य ठाकरे
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रशासकानं (Administrator) परवा रात्री साडेदहा वाजता एक प्रेस नोट काढली. त्यात रस्त्याच्या टेंडरचा उल्लेख केला होता. कंत्राटदार हे सरासरी आठ टक्के हाईकवर गेले आहेत. असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. मनपानं हे कंत्राट युनिलॅटररी देत आहोत, असं सांगितलं. याचा अर्थ निगोशिएशनला कोणी कंत्राटदार आले नाहीत. हे पाच कंत्राटदार (Contractor) आहेत. दोनदा बोलावलं असताना ते चर्चेसाठी आले नाही. शेवटी हे मुंबईतील रस्त्याचे कंत्राट दिले गेले. यात आमचा पहिला विजय झाला आहे. कारण मी जे बोलत होते ते खरं होतं. मुंबईकरांचे साडेचारशे कोटी वाचवू शकलो आहोत, असंही ते म्हणाले.

कंत्राटदार निगोशिएशनला आले नाही. ही परिस्थिती आता आहे. पुढं हे कंत्राटदार महापालिकेचं काय ऐकणार, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. यात व्हेरिएशनचा क्लॉज आहे का. याच उत्तर महापालिकेनं कुठंही दिलेलं नाही.

हे कंत्राटदार कोण आहेत. त्यांची नाव काय आहेत. त्यांना कुठची पॅकेट्स मिळालीत. यांना कुठं, किती काम मिळालेली आहेत. किती दरानं काम मिळालेली आहेत, हे कुठंही समोर आलं नाही. नगरसेवक असताना ही बाब पुढं यायची. पण, ही बाब अद्याप कुठंही पुढं आलेली नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

बीएमसीने रेट ठरविले

बीएमसीनं रेट ठरविला होता. त्याचं दराला हे कंत्राट युनिलॅटररी दिले असतील. याचा अर्थ बीएमसीने रेट स्वतः ठरविले आहेत. कंत्राट स्वतः दिलेले आहेत. टेंडरिंग प्रोसेसला काही नाव देण्यात आले नाही. बीएमसीने स्वतः कंत्राटदार निवडले. तसंच त्यांनी काम वाटलं आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. आवडी-निवडीचे कंत्राटदार दिले तर नाही, असा मोठा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.

शिवसेना कुणाची हे सर्वांना माहीत

शिवसेना कुणाची हे सगळ्यांना माहीत आहे. त्यावर प्रश्न उद्भवत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या सैनिकांची, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि शिवसैनिकांची शिवसेना आहे. जे गेलेत ते गद्दार आहेत. या विषयावर उद्या बोलणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.