AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कारमधलं कळत नाही तर कशाला कंपनी सुरु करायची”, Ford कंपनीच्या मालकाने केलेला रतन टाटांचा अपमान आणि ९ वर्षांनी…

रतन टाटा यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी गोष्टी आहेत. त्यातच आता रतन टाटा यांनी एका अपमानाचा बदला घेतल्याचा किस्सा सध्या व्हायरल होत आहे.

कारमधलं कळत नाही तर कशाला कंपनी सुरु करायची, Ford कंपनीच्या मालकाने केलेला रतन टाटांचा अपमान आणि ९ वर्षांनी...
| Updated on: Oct 10, 2024 | 3:39 PM
Share

Ratan Tata Passed Away : भारतीय उद्योगजगताचे शिल्पकार आणि टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा यांचे काल (9 ऑक्टोबर 2024) निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस हरपला अशी प्रतिक्रिया सध्या सर्वत्र उमटताना दिसत आहे. रतन टाटा यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी गोष्टी आहेत. त्यातच आता रतन टाटा यांनी एका अपमानाचा बदला घेतल्याचा किस्सा सध्या व्हायरल होत आहे.

रतन टाटा यांनी देशाच्या प्रेमापोटी इंडिका नावाची गाडी बाजारात आणली. पण ही कार भारतीय बाजारात फारशी चमक दाखवू शकली नाही. यामुळे टाटा मोटर्सला मोठा आर्थिक फटका बसला. यानंतर टाटांना अनेक सहकार्यांनी विभाग बंद करण्याचा सल्ला दिला. रतन टाटा यांनाही हा सल्ला पटला. त्यानंतर त्यांनीही १९९९ टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय घेतला. यानंतर रतन टाटा हे अमेरिकेतील फोर्ड कंपनीच्या मालकाला भेटण्यासाठी गेले.

यावेळी फोर्ड कंपनीचा मालक आणि रतन टाटा यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये तीन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर कडून असे सांगण्यात आलं की, जर तुम्हाला कारमधलं काहीही कळत नसेल तर मग तुम्ही अशी कंपनी सुरुच कशाला करायची. जर आम्ही ही कंपनी विकत घेतली तर हे तुमच्यावर खूप मोठे उपकार असतील, असे फोर्डकडून सांगण्यात आले. हे ऐकल्यानंतर टाटांना खूप अपमानास्पद वाटले.

जॅग्वार, लँड रोव्हर या कार कंपन्या विकत घेतल्या

यानंतर त्यांनी कार प्रोडक्शन विभाग खूप मेहनतीने आणि लक्षपूर्वक चालवण्याचा निर्णय घेतला. यानंतर २००८ पर्यंत टाटांचा वाहन निर्मिती व्यवसाय प्रचंड मोठा झाला होता. 2008 साली अमेरिकेमध्ये मंदीची मोठी लाट आली. या लाटेत फोर्डला मोठा फटका बसला. फोर्ड कंपनीवर जॅग्वार आणि लँड रोव्हर या कंपन्या विकण्याची वेळ फोर्डवर आली होती. जॅग्वार, लँड रोव्हर या अलिशान कार कंपन्या विकत घेण्यासाठी टाटांनी बिल फोर्ड यांना ऑफर दिली.

यावेळी रतन टाटांसोबतच्या बैठकीसाठी बिल फोर्ड अमेरिकेतून भारतात आले. या दोघांमध्ये सविस्तर चर्चा पार पडली. डील यशस्वी झाली. रतन टाटांनी फोर्डकडून जॅग्वार, लँड रोव्हर या 2 कंपन्या २.३ अब्ज डॉलर्सला विकत घेतल्या. यावेळी मात्र फोर्ड कंपनीने रतन टाटांचे कौतुक केले. “तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर फार उपकार केले.” अशी प्रतिक्रिया त्यावेळी फोर्ड यांनी व्यक्त केली. जॅग्वार, लँड रोव्हर या कंपनीच्या खरेदीमुळे टाटा आणि फोर्ड यांच्यातील व्यवहाराची जगभरात चर्चा झाली होती. सध्या लँड रोव्हरच्या कार जगभरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत आहेत.

Follow Us
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी