भारताच्या जागतिक दबदब्याचा अनुभव कुठे आला?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं

डबल इंजिन सरकारमुळं महाराष्ट्राचा विकास होत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या जोडीमुळं विकासाला गती आली आहे. पायाभूत सुविधांवर ३०० किलोमीटरच्या ट्रॅकसाठी आम्ही पुढं जात आहोत.

भारताच्या जागतिक दबदब्याचा अनुभव कुठे आला?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 6:55 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथील बीकेसी मैदानावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणं झाली. त्यानंतर बोलताना पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, गेल्या आठ वर्षांत भाजप सरकारने देशात बदल घडविला. आधुनिकतेवर खर्च केला जात आहे. देशात घर, टॉयलेट, वीज, पाणी, गॅस, मोफत उपचार, मेडिकल कॉलेज, आयआयटी, आयआयएम यांची निर्मिती होत आहे. आधुनिक सुविधा देशात तयार होत आहेत. आजची गरज काय आहे, त्यावर काम सुरू आहे. जगातील अर्थव्यवस्था बेहाल आहेत. अशावेळी भारतातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन देत आहे.

देश मोठे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. गरिबांची चर्चा करणे, दुसऱ्यांना मदत करण्यात वेळ घालविला गेला. जगाला भारताच्या संकल्पांना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाओसमधून अनुभव सांगत होते. त्यांनी गुंतवणुकीसाठी ओमओयू केले.

हा सकारात्मक अनुभव देशात येत आहे. आपल्या सामर्थ्याचा अतिशय चांगला उपयोग देश करत आहे. भारत आत्मविश्वासानं भरलेला आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

डबल इंजिनमुळे विकासाची गती

डबल इंजिन सरकारमुळं महाराष्ट्राचा विकास होत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या जोडीमुळं विकासाला गती आली आहे. पायाभूत सुविधांवर ३०० किलोमीटरच्या रस्त्यासाठी आम्ही पुढं जात आहोत. रेल्वेचे आधुनिकीकरण होत आहे. राज्यातील रेल्वे कनेक्टिव्हीटीने काम होत आहे. साफसफाई जोरानं होत आहे.

मल्टिमॉडल हब

रेल्वे स्थानकांना विमानतळासारखं विकसित केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकही विकसित होत आहे. लोकल आणि रेल्वेसाठी प्रयत्न केला जात आहे. बस, मेट्रो, टॅक्सी, रेल्वे ही सर्व मल्टिमॉडल कनेक्टिव्ही मोठ्या शहरात विकसित केले जात आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

येणाऱ्या काही वर्षात मुंबईचा विकास केला जात आहे. सर्वांसाठी येथे राहणे सुविधाजनक राहील. मुंबई येणे-जाणे सुलभ होणार आहे. नवीन प्रकल्प मुंबईला नवी ताकद देत आहेत, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.