Ratan Tata: रतन टाटा यांच्या मुंबईतील 150 कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात आता कोण राहतं?

रतन टाटा यांचा आलिशान बंगला मुंबईतील कुलाबा इथे आहे ज्याची किंमत 150 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या सुंदर पांढऱ्या आलिशान घरात आता कोण राहतं हे जाणून घ्या.

Ratan Tata: रतन टाटा यांच्या मुंबईतील 150 कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात आता कोण राहतं?
ratan tata mumbai bungalow
| Updated on: Nov 16, 2026 | 10:19 AM

2024 साली 9 ऑक्टोबरला देशातील प्रेरणादाई, प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना आपण कायमचे गमावले आहे. अनुभवी आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांची खाती होती. नम्रता, साधं राहणीमान आणि उत्तम विचारामुळे ते अनेक कोटी लोकांसाठी आदर्श बनले होते. जरी त्यांनी मोठ्या कंपन्या उभारल्या होत्या, तरी त्यांची जीवनशैली नेहमीच साधी आणि शांत राहिली. या साधेपणाची झलक त्यांच्या मुंबईतील घरामध्येही पाहायला मिळते.

कुठे आहे त्यांचं घर?

रतन टाटा यांचा सुंदर बांगला हा मुंबईतील पॉश परिसरात कुलाब्यात आहे. या घराला अनेकदा ‘निवृत्तीनंतरचे घर’ असेही म्हटले जाते.
या भव्य बंगल्याला ‘बख्तवार’ आणि ‘कॅबिन्स’ अशा सुंदर दोन नावांची ओळख आहे. या घराची पूर्णपणे थीम ही पांढऱ्या रंगावर आधारित आहे, ज्यामुळे ते अतिशय शांत आणि सुंदर दिसते.

Loading...

13,350 चौरस फुटांत पसरलेला सुंदर बंगला

13,350 चौरस फुटांत हा सुंदर बंगला पसरलेला आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार याची किंमत अंदाजे 150 करोड रुपये सांगितली जात आहे. या बंगल्यात काही फॅन्सी असं नाही किंवा महाग फर्निचर नाही. या बंगल्यात फक्त हवी हवीशी वाटणारी शांती आहे. जरी हे घर एखादे भव्य राजवाड्यासारखे आलिशान घर नसले, तरी यातील प्रत्येक कोपरा रतन टाटा यांची दूरदृष्टी आणि शांततेची जाणीव दर्शवतो. घरातील वातावरण अत्यंत साधे, तरीही राजेशाही थाटाचे आहे. लाकडी जिने, उंच कमानी असलेली छतं आणि सुंदर नक्षीकाम केलेले काम या घराला व्हिंटेज लूक देतात. व्हिक्टोरियन शैलीपासून प्रेरित असलेले हे घर आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही शैलींचे एक उत्तम मिश्रण आहे.

घरामध्ये कोण-कोणत्या सुविधा उपलब्ध?

रतन टाटा यांच्या या बंगल्यात अनेक सुविधा उपल्बध आहेत. घरामध्ये प्राइवेट जिम, लायब्रेरी, मुलांना खेळण्यासाठी प्लेरूम याशिवाय सुंदर स्वामिंग पूलही आहे. याशिवाय इथे मोठे पार्किंग आहे. या पार्किंगमध्ये जवळपास 15 गाड्या सहज पार्क होऊ शकतात.

प्रार्थना कक्ष आणि सुंदर बाग

रतन टाटा त्यांच्या आध्यात्मिक बाजूसाठीही ओळखले जात असत. त्यांच्या घरातील प्रार्थना कक्ष अत्यंत शांत आणि साधे आहे; तिथे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणि इतर अनेक देव-देवतांची चित्रे आहेत. याव्यतिरिक्त, या मालमत्तेमध्ये एक सुंदर बाग आहे, ज्यामध्ये सुंदर हिरवे लॉन आणि मोठी झाडे आहेत.

आता या घरात कोण राहतं?

आता तुम्हालाही हा प्रश्न पडलाच असेल की रतन टाटा यांच्या घरात आता नेमकं कोण राहतं? मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे घर सध्या रिकामे आहे. मात्र, भविष्यात रतन टाटा यांचे बंधू, नोएल टाटा, येथे राहण्यासाठी येऊ शकतात, अशी चर्चा आहे. परंतु, याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us