AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Parab : रामदास कदम यांच्या बायकोने स्वत:ला का जाळून घेतलं? नार्को टेस्ट झालीच पाहिजे; अनिल परबांचा रामदास कदमांवर मोठा बॉम्ब

Anil Parab on Ramdas Kadam : शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर आज ठाकरे सेनेचे नेते अनिल परब यांनी कदमांवर मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी आरोपांची राळ उडवली.

Anil Parab : रामदास कदम यांच्या बायकोने स्वत:ला का जाळून घेतलं? नार्को टेस्ट झालीच पाहिजे; अनिल परबांचा रामदास कदमांवर मोठा बॉम्ब
अनिल परब, रामदास कदम
| Updated on: Oct 04, 2025 | 1:14 PM
Share

दसरा मेळाव्यात शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांचा देह दोन दिवस का ठेवला, बोटाचे ठसे का घेतले असे प्रश्न उपस्थित करत शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी आरोपांची राळ उडवून दिली. राजकीय पटलावर यामुळे मोठी खळबळ उडाली. त्याला आज ठाकरे सेनेच्या कॅम्पमधून प्रखर उत्तर मिळाले. अनिल परब यांनी कदमांवर मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी कदमांवर गंभीर आरोप केले.

कदमांच्या बायकोने जाळून घेण्याचा प्रयत्न का केला?

1993 मध्ये ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, जाळून घेण्याचा प्रयत्न केला. जाळून घेतलं की जाळलं? आजही खेडमध्ये घटनेचे साक्षीदार आहेत. गरज पडली तर त्यांनाही मी समोर आणेल. खूप साक्षीदार आहेत. म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही संस्कृती बंद करा, असा हल्ला अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर चढवला. तर गृहराज्यमंत्री आणि रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनाही त्यांनी डिवचले.

आज गृहराज्य मंत्र्याची ताकद दाखवताना डान्सबारवर जाऊन रेड मारल्याचं दाखवताना, मग स्वत च्या घरात काय चाललंय त्याची चौकशी करा. १९९३ मध्ये तुमच्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला. स्वत: ला का जाळून घेण्याचा प्रयत्न कर. त्याची चौकशी केली पाहिजे. नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी केली.

या अधिवेशनात पुरावे सादर करणार

आताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी रामदास कदम आणि योगेश कदम या पित्रापुत्रांविरोधात आरोपांची राळ उडवून दिली. या अधिवेशनात जे पुरावे आले. मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलं आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर आरोप आहे. अशा शिशुपलांना तुम्ही का वाचत आहात. तुमची अशी काय मजबुरी आहे. त्यांना का वाचवत आहेत. अस सवाल परब यांनी केला.

मागच्या अधिवेशनात तर दोनच प्रकरण आली बाहेर. या अधिवेशनात पुराव्यासकट प्रकरणं देणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही किती वेळा यांना वाचवणार. तुम्ही किती वेळा बदनामी करताय सरकारची. तुमचं सरकार यांच्या मुळे डागळलं जातंय. मुख्यमंत्र्यांनी प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी असे नासके आंबे हाकलून दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...