मोठी बातमी, दूध-पनीर भेसळखोरांचे धाबे दणाणले, ‘मकोका’ लागणार? एकनाथ शिंदे यांचे थेट कारवाईचे निर्देश
MCOCA on Milk and Paneer Adulterators: दूध, पनीर आणि इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना दणका बसणार आहे.त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कठोर कारवाईचा बडगा उगारल्या जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयीचे निर्देश दिले आहेत. काय आहे मोठी अपडेट?

दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होते. अबालवृद्धांच्या आरोग्याशी खेळण्यात येते. अशा भेसळखोरांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. अन्न भेसळीचे प्रकार संघटित पद्धतीने होत असल्याचे समोर आले आहे. या सर्वांवर आता मकोका अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयीचे निर्देश दिले आहेत. या आरोपींविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाऊ शकते. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे.
अन्न भेसळीविरोधात कडक कारवाईचे निर्देश
विकसीत महाराष्ट्र 2047 अंतर्गत 2026-27 या वर्षासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची (एफडीए) बैठक झाली. त्यात उद्दिष्ट निश्चित करण्यात आली. या बैठकीत विभागाच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. अन्न भेसळीविरोधात कठोर कारवाईचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. भेसळखोरांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हा तर नागरिकांच्या जीवाशी खेळ
अन्नपदार्थामध्ये भेसळ करणे हा साधा गुन्हा नाही. अबालवृद्धांच्या जीवाशी खेळ असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत मत व्यक्त केले. लहान मुलं मोठ्या प्रमाणात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खातात. बनावट पनीर, भेसळयुक्त दूध आणि इतर खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा भेसळखोरांविरोधात कोणतीही नरमाई दाखवू नये त्यांच्या संघटित टोळ्यांवर कडक कारवाई करावी असे निर्देश शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
भेसळखोरांविरोधात मकोका लागणार?
दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्यात येण्याची शक्यता आहे. भेसळीची तपासणी, नमुने घेणे, प्रयोगशाळा तपासणी आणि त्यानंतरची कायदेशीर कारवाई करण्यावर भर देण्यात येत आहे. अन्नपदार्थांमधील भेसळखोरांविरोधात कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे संकेत आता देण्यात आले आहे. यामुळे भेसळखोरांविरोधात मकोका लागणार का? याची चर्चा झाली आहे. भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची सूत्र हाती घेतल्यापासून भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या विभागाच्या धाडसत्रामुळे भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थांची बाजारातील आवक घटली आहे. तर अनेक हॉटेल, धाबा चालक, रेस्टॉरंट चालकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या कारवायांना लोकांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे.