मुख्यमंत्रीपद घेताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती; एकनाथ शिंदे यांचा घणाघात

| Updated on: Oct 05, 2022 | 10:15 PM

अन्याय करून कुणालाही आमच्या पक्षात घ्यायचं नाही.

मुख्यमंत्रीपद घेताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती; एकनाथ शिंदे यांचा घणाघात
एकनाथ शिंदे यांचा घणाघात
Image Credit source: t v 9
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. बीकेसीवरील दसरा मेळाव्यात बोलताना शिंदे म्हणाले, लाज तुम्हाला वाटायला हवी होती. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून तुम्ही सत्ता मिळवली. छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती. बाळासाहेब असते तर हा मुख्यमंत्री झाला नसता हे नारायण राणेंनी सांगितलं. मी पुढचं काही बोलणार नाही. हा अधिकार राणे साहेंबाना आहे.

मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मला कटप्पा म्हणाले. पण कटप्पा स्वाभिमानी होता. प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. कोणत्याही शिवसैनिकाला त्रास दिला नाही. असं बोगस काम करणारे नाही. आम्ही समोरून वार करणारे. तुमच्यासारखं पाठीत खंजीर खुपसणारे नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

आम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही. अन्याय करून कुणालाही आमच्या पक्षात घ्यायचं नाही. कोणी चूक केली आणि कोण बरोबर आहे. असले धंदे तुम्ही केले. आम्ही नाही.

इमोशनल ब्लॅकमेलिंग चालणार नाही. हे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. कोथळा काढण्यापेक्षा पोटाची खळगी भरायला शिका. कोथळा जाऊ दे तुम्ही कुणाला एक चापट तरी मारलीय का.

बोलायचा अधिकार या लोकांना आहे. त्यांच्यावर शंभर शंभर केसेस आहेत. प्रत्येक केसमध्ये मी एक नंबर आरोपी होतो. तुमच्यावर किती केसेस आहेत. ज्यांच्यावर केस आहे. त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यांना गद्दार म्हणता. कुठे फेडालं हे पाप.

माझा नातू बच्चू दीड वर्षाचा आहे. रुद्रांश. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करताय त्या दीड वर्षाच्या बाळावर. तुम्ही मुख्यमंत्री झाले. तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काही बोललो.

एक ग्रामीण भागातील मंत्री झाला असताना. काय बोलायचं किती बोलायचं किती लेव्हलवर जायचं. पायाखालची वाळू सरकली ना, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.