कारच्या किमतीची मुऱ्हा म्हैस, येवल्यातील शेतकरी मालामाल

| Updated on: Feb 10, 2021 | 2:44 PM

येवल्यातील एक दुग्धव्यवसायिक शेतकरी एका म्हशीमुळे मालामाल झाला आहे (Murha buffalo sold in 2.5 lakh rupees in Yewala).

कारच्या किमतीची मुऱ्हा म्हैस, येवल्यातील शेतकरी मालामाल
कारच्या किमतीची मुऱ्हा म्हैस, येवल्यातील शेतकरी मालामाल
Follow us on

येवला (नाशिक) : येवल्यातील दुग्धव्यवसायिक शेतकरी किशोर परदेशी एका म्हशीमुळे मालामाल झाले आहेत. त्यांच्याजवळ मुऱ्हा जातीची म्हैस होती. या म्हशीने शेतकऱ्याला तब्बल एका कारची किंमत मिळवून दिली आहे. ही म्हैस अडीच लाखांपेक्षा जास्त रुपयात विकली गेली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे (Murha buffalo sold in 2.5 lakh rupees in Yewala).

म्हशीच्या दुधाला चांगली किंमत असते म्हणून म्हशींच्या किंमती सुद्धा जास्त महाग असतात. सामान्य शेतकऱ्याने विचार केल्यास एक म्हशीची किंमत किती असू शकते? फार फार तर एक लाख, असं शेतकरी उत्तर देईल. मात्र, येवल्या तालुक्यातील पारेगाव येथील म्हशीला 2 लाख 51 हजार रुपये इतकी किंमत मिळाल्याने ही म्हैस लक्षवेधी ठरली आहे.

येवला तालुक्यातील पारेगाव येथील दुग्ध व्यवसायिक शेतकरी सुनील गवळी यांनी खरेदी केलेल्या म्हशीला तब्बल 2 लाख 51 हजार रुपये दिल्याने ही मुऱ्हा जातीची म्हैस लक्षवेधी ठरली आहे. त्याचे कारण सर्वसाधारण म्हशीची किंमत चाळीस ते पन्नास हजार रुपयांच्या घरात असते. मात्र या म्हशीला 2 लाख 51 हजार रुपये इतका उच्चांकी बाजार भाव मिळाल्याने या म्हशीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि शेतकरी गर्दी करत आहे.

ही मुऱ्हा जातीची म्हैस उंच, तडफदार, डौलदार आहे. तिचे शिंगे काळीभोर देखणे आहे. ती एकावेळी 18 लिटर दूध देणारी म्हैस असल्याने सुनील गवळी यांच्यासाठी हे वरदानच ठरणार आहे. ही म्हैस तीन लाख रुपयांना ग्राहक सुद्धा मागणी करू लागले आहे. मात्र ही म्हैस संगोपणासाठी घेतली असल्याने तिचा सांभाळ करणार आहे, असं गवळी यांनी सांगितलं (Murha buffalo sold in 2.5 lakh rupees in Yewala).

हेही वाचा : आफ्रिकन शेळीने नेवास्यातील शेतकऱ्याचं नशीब पालटलं, एका शेळीला बुलेटची किंमत!