रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृत्यू की घातपात? सर्वात धक्कादायक सत्य समोर; आईमुळे…

२२ ऑगस्ट रोजी रात्री आईने रागावल्याने ही मुलगी घरातून निघून गेली होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र ती आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. नंतर तिचा मृतदेह सापडला होता.

रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृत्यू की घातपात? सर्वात धक्कादायक सत्य समोर; आईमुळे...
Death of MLA Rohit Pawar's PA's daughter
| Updated on: Aug 25, 2026 | 7:55 PM

आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. २२ ऑगस्ट रोजी रात्री आईने रागावल्याने मुलगी घरातून निघून गेली होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र ती आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सुरुवातीला तिचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त झाल्याने पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला होता. अखेर या प्रकरणा मागचे सत्य पोलिसांनी शोधून काढले आहे.

संबंधित मुलीने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, आईसोबत झालेल्या वादानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. २२ ऑगस्ट रोजी रात्री आईने रागावल्याने मुलगी घरातून निघून गेली होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र ती आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सुरुवातीला तिचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त झाल्याने पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला होता.

दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी सकाळी रुई परिसरातील एका पाच मजली इमारतीजवळ अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान हा मृतदेह बेपत्ता झालेल्या मुलीचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत हत्या की आत्महत्या, यावर विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.

उडी मारून तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न

पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींचा तपास केल्यानंतर मुलगी शेजारील पाच मजली इमारतीवर गेली आणि तेथून उडी मारून तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार आणि बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी उपस्थित होते.

 

 

 

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us