Nagpur Lockdown Update : नागपुरात कडक निर्बंध, भाजी-फळं-चिकन मटण दुकानाच्या वेळा बदलल्या!

| Updated on: Mar 17, 2021 | 3:11 PM

नागपुरात वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आणखी कडक निर्बंध लावले आहेत. Nagpur Lockdown Update

Nagpur Lockdown Update : नागपुरात कडक निर्बंध, भाजी-फळं-चिकन मटण दुकानाच्या वेळा बदलल्या!
नागपूर महापालिका
Follow us on

नागपूर : नागपुरात वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आणखी कडक निर्बंध लावले आहेत. दुकानाच्या सध्याच्या वेळा पाहता त्यात काही बदल केले गेले आहेत. नव्या नियमानुसार भाजीची दुकाने, फळांचे स्टॉल चिकन मटणची दुकान आता फक्त 1 वाजेपर्यंत सुरु राहतील, असे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी काढले आहेत. (Nagpur Lockdown Update Municipal Corporation Rules And regulation)

नागपुरात आज लॉकडाऊनचा तिसरा दिवस… मात्र सकाळच्या वेळी नागरिकांची रस्त्यावर गर्दी झाली. मात्र बाहेर पडण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं…  कोणाला ऑफिसला जायचं आहे, कोणी अत्यावश्यक सेवेत आहे तर कोणाला रुग्णालयात… पोलिसांकडून कडक कारवाई होत आहे मात्र अजूनही नागरिक रस्त्यावर पाहायला मिळत आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेता जे निर्बंध लावण्यात आले त्यात काही बदल करुन भाजी, फळ चिकन मटण ची दुकान आता फक्त 1 वाजेपर्यंत सुरू राहील. कोरोनाची चैन तोडण्यासाठी या उपाय योजना आवश्यक आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

‘नियम पाळा, कारवाई टाळा’

शहरातील 10 झोन पैकी 4 झोनमध्ये कोरोनाचं संक्रमण जास्त आहे. रुग्ण संख्या वाढत आहे कारण आता टेस्टिंगची संख्या देखील वाढविण्यात आली. जवळपास 10 हजारच्या वर रोज टेस्टिंग होत आहे. संख्या वाढते आहे याची काळजी करण्याची गरज नाही फक्त प्रत्येकाने नियमांचं पालन करणे आवश्यक आहे, असं राधाकृष्णन बी म्हणाले.

नागपुरात क्वारन्टाईन सेंटर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सोबतच लसीचे आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसंच कोरोनाचे रुग्ण जरी वाढत असले तरी याला दुसरी लाट मनायला हरकत नाही. मात्र याला घाबरण्याचे काम नाही. नागिरकांनी फक्त नियम पाळावेत रुग्ण वाढीतून आपण लवकर बाहेर पडूं, असं महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सांगितलं.

नागपुरात काय काय होतंय?

नागपुरात लॉकडाऊन 21 मार्च पर्यंत…
काही नियमात बदल करण्यात आले…
आता किराणा, भाजी, फळ, चिकन, मटणाची दुकान फक्त दुपारी 1 पर्यंत सुरू राहणार…
पोलीस कारवाई वाढविण्यात आलीय…
शहरातील उड्डानपुलं वाहतुकीसाठी बंद…
टेस्टिंग वाढविण्यात आल्यात…
बंद झालेले जम्बो क्वारान्टीन सेंटर पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू…
औषधांचा साठा मुबलक प्रमाणात…

कोरोना नियमांचं उल्लंघन, एकाच दिवशी 50 हजार रुपयांचा दंड वसूल

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (9 मार्च) रोजी 9 दूकाने प्रतिष्ठानांवर कारवाई करुन 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. शासन आणि प्रशासनाने कोरोनाचे घालून दिलेले नियम न पाळल्याने हा दंड वसूल करण्यात आला. (Violation of Corona rules fine of Rs 50,000 on One day Nagpur Municipal Corporation Action)

महापालिकेच्या पथकाने 97 प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

कशी केली कारवाई?

महापालिकेच्या पथकाने 97 प्रतिष्ठाने आणि मंगल कार्यालयांची तपासणी केली. यामध्ये शारिरीक अंतर न पाळणाऱ्यांकडून दंड वसूल केला गेला. यामध्ये एकाच दिवशी तब्बल 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या कारवाईमुळे नियम पायदळी तुडवणारे आतातरी जागे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(Nagpur Lockdown Update Municipal Corporation Rules And regulation)

हे ही वाचा :

कोरोना नियमांचं उल्लंघन, एकाच दिवशी 50 हजार रुपयांचा दंड वसूल, नागपूर महापालिकेचा दणका