इंग्लंडवरुन नागपुरात आला, तिथून गोंदियाला गेला, कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने विदर्भाला धाकधूक

| Updated on: Dec 24, 2020 | 11:36 AM

नागपूरमधील 28 वर्षीय तरुण कोरोनाबाधित (Nagpur man visited UK tested positive ) झाल्याने खळबळ उडाली आहे.

इंग्लंडवरुन नागपुरात आला, तिथून गोंदियाला गेला, कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने विदर्भाला धाकधूक
नागपूरमधील 28 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळला आहे.
Follow us on

नागपूर : इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला नागपूरमधील 28 वर्षीय तरुण कोरोनाबाधित (Nagpur man visited UK tested positive ) झाल्याने खळबळ उडाली आहे. आधीच कोरोनाचा नवा अवतार लंडनमध्ये सापडल्याने  (New Strain of Coronavirus UK) जगभरात धाकधूक वाढली आहे. त्यातच इंग्लंडवरुन नागपूरमध्ये आलेला तरुण कोरोनाबाधित आढळल्याने, परिसरात भीतीचं वातावरण आहे. (Nagpur man who visited UK tested coronavirus positive)

हा तरुण पुण्यातील एका कंपनीत जॉबला आहे. कंपनीच्या कामानिमित्त तो इंग्लंडला गेला होता. 29 नोव्हेंबरला तो नागपुरात आला. तिथून तो गोंदियाला गेला. त्याच्या संपर्कातील 10 जण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

हा तरुण 29 नोव्हेंबर रोजी इंग्लंडवरुन नागपुरात आला होता. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीयसुद्धा क्वारंटाईन झाले. त्यादरम्यान लक्षणे जाणवल्याने या तरुणाने कोरोना चाचणी केली होती. यादरम्यान त्याला कोरोना झाल्याचं समोर आलं. मात्र या तरुणाला नेमका कोणता कोरोना झाला, हे तपासण्यासाठी त्याचे नुमने पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आला होता.

कोरोनाचा नवा अवतार आशियात धडकला

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार आढळून आल्यानंतर संपूर्ण जग चिंतेत आहे. अशात कोरोनाच्या नव्या अवताराची लागण झालेल्या एक रुग्ण आशिया खंडात आढळून आलाय. त्यामुळे आशिया खंडातील देशांना आता मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूच्या नव्या अवताराची लागण झालेल्या एक रुग्ण सिंगापूरमध्ये सापडला आहे. सिंगापूर सरकारनेही या बातमीची पुष्टी केली आहे.

कोरोनाचा नवा अवतार

ब्रिटनमध्ये कोरोनानं पुन्हा कमबॅक केला आहे. कोरोना स्ट्रेन नावानं याला ओळखलं जात आहे. या विषाणूला अद्याप कुठलंही नाव ठेवण्यात आलेलं नाही. मात्र याचा फैलाव कोरोनाहून कित्येक पटीनं अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये यानं पाय पसरायला सुरुवात केली. आता या विषाणूनं आक्राळ-विक्राळ रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. शास्रज्ञांच्या म्हणणानुसार कोरोना विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक प्रमाणात याचा संसर्ग सुरु आहे.

(Nagpur man who visited UK tested coronavirus positive)

संबंधित बातम्या  

कोरोनाचा नवा अवतार आशियात धडकला, पहिला रुग्ण सापडला

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट