Nagpur : टूरिस्ट स्पॉटवर माकडाने अशा ठिकाणी बॅग हिसकावली की शिक्षकाच्या आयुष्याचा शेवट

Nagpur Teacher in Pachmarhi News: नागपूरच्या एका शिक्षकासोबत अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशात पर्यटनासाठी गेलेल्या शिक्षकाची मकडाने अशा ठिकाणी बॅग हिसकावली, ज्यामुळे शिक्षकाच्या आयुष्याचाच शेवट झाला.

Nagpur : टूरिस्ट स्पॉटवर माकडाने अशा ठिकाणी बॅग हिसकावली की शिक्षकाच्या आयुष्याचा शेवट
| Updated on: Nov 07, 2026 | 11:13 AM

Nagpur Teacher in Pachmarhi News: एखाद्या व्यक्तीचं निधन तेव्हाच होतं, जेव्हा त्याची वेळ आणि काळ येतो. पण व्यक्तीचा काळ आणि वेळ कधी येईल काहीही सांगता येत नाही. असं काही नागपूरच्या एका शिक्षकासोबत झालं आहे. मध्य प्रदेशातील लोकप्रिय पर्यटनस्थळ पचमढी येथे पर्यटानासाठी गेलेल्या नागपूरच्या एका शिक्षकाचं दरीत कोसळून निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी दुर्दैवी निधन झालेल्या शिक्षकाचं नाव विजय नायक असं आहे. विजय नाईक हे नागपुरातील रामदासपेठ येथील सोमलवार शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात खळबळ माजली आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, विजय नाईक हे पचमढीच्या पॉइंटवर फिरत असताना त्यांची बॅग एका माकडाने हिसकावली… ती परत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या विजय नायक यांचा तोल गेला आणि ते खोल दरीत कोसळले. माहितीनुसार, विजय नायक हे पर्यटकांच्या एका गटासह गुरुवारी सायंकाळी नागपूरहून पचमढी येथे पोहोचले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर फिरण्याचा आनंद होतं, पण पुढे काहीतरी भयानक घडणार आहे. याचा कोणी विचार देखील केला नसेल…

Loading...

शुक्रवारी एका गटासोबत विजय नायक देखली प्रियदर्शनी पॉइंट येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथे निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असताना फोटो काढण्याच्या वेळी एका माकडाने विजय यांची बॅग हिसकावली. बॅग मिळवण्यासाठी विजय नाईक देखील माकडाच्या दिशेने धावून जाण्याचा प्रयत्न करु लागले. पण त्याच वेळी त्यांचा पाय घसरला आणि संतुलन बिघडल्याने ते थेट खोल दरीत कोसळले. विजय नायक हे 150 फूट खोल दरीत कोसळून मृत्युमुखी पडले.

घनटने माहिती मिळताच, पचमढी पोलीस घटनास्थळी पोहोचले… अशात पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने विजय यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. अखेर शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नागपूरला रवाना करण्यात आहे. मात्र या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नायक कुटुंबियांवर दुःखाचा डोगर कोसळाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, – विजय नायक यांच्या पश्चात दोन मुली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us