युनिक कलेक्शन बघायचंय, तर चला सुरेश भट सभागृहात, नागपुरात आज आणि उद्या विविध कलाकृतींचा संग्रहच संग्रह…!

| Updated on: Feb 26, 2022 | 9:23 AM

नागपुरात आज आणि उद्या दोन दिवस युनिक कलेक्शन पाहण्याची संधी आहे. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात (Poet Suresh Bhat Hall at Nagpur) या कला प्रदर्शनीचं आयोजन सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा या वेळात केले आहे. अनेक ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहांची अनुभूती या प्रदर्शनीच्या माध्यमातून नागपूरकरांना होणार आहे. या प्रदर्शनीला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

युनिक कलेक्शन बघायचंय, तर चला सुरेश भट सभागृहात, नागपुरात आज आणि उद्या विविध कलाकृतींचा संग्रहच संग्रह...!
नागपुरातील याच सुरेश भट सभागृहात कला प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलंय.
Follow us on

नागपूर : शनिवारी आणि रविवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह (Poet Suresh Bhat Hall at Nagpur) येथे युनिक कलेक्शन आणि कला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महापालिका आणि छंद सम्राट बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आलंय. शनिवारी महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता या प्रदर्शनीचे उद्घाटन करतील. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंते राजे डॉ. मुधोजी भोसले (Shrimant Raje Dr. Mudhoji Bhosale ) हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मनपाचे क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, छंद सम्राट बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दिलीप डाहाके, उपाध्यक्ष सुनील रेड्डी, सचिव गणेश डुमरे प्रामुख्याने उपस्थित राहतील. शनिवारी व रविवारी दोन्ही दिवस सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत कविवर्य सुरेश भट सभागृहात कला रसिकांसाठी प्रदर्शनी सुरू राहील. प्रदर्शनीमध्ये विविध युनिक कलेक्शन असलेल्या संग्रहांसह शहरासह बाहेरील अनेक सहभागी सहभाग घेणार आहेत.

काय पाहायला मिळणार?

दिलीप डाहाके (आटोग्रॉफ सोबत फोटो संग्रह), सुनील रेड्डी (मिनीचर हवाई जहाज संग्रह), गणेश डुमरे, (उलटे लेखन इंग्रजी, मराठी/हिंदी आर्ट), कविता मेश्राम (शैक्षणिक प्रशिक्षण), दिपक संत (देशी/विदेशी वर्तमानपत्रांचा संग्रह), सुबीरकुमार दासगुप्ता (विदेशी माचिस संग्रह), वैशाली सोनार (ब्रिटीशकालीन नाणी संग्रह), अरुण गुल्हाणे (फोम मॉडेल आर्ट), पुष्कराज देशपांडे (माचीस/विदेशी अमेरिकन नाणी), जयंत तांदुळकर (वुडन मिनीचर क्राफ्ट, बॉटल आर्ट), विभा मोडक (मातीची भांडी), रेखा सरदार (उलटे गाणी व मिरर लेखन आर्ट), गजानन पटवर्धन, सांगली (देशी/विदेशी गुलाब पोस्टल तिकीटे संग्रह), ओजस तांदुळकर (टॉय कार संग्रह), सोहम अपराजित (ओरोगामी मॉडेल आर्ट), निशांत ठवरे, (नोटांचा व नाण्यांचा संग्रह), सौदागर बेवनाळे (ऐतिहासिक नाणी, नोटा, पोस्टल बाँड, शस्त्रे संग्रह व अभ्यासक), दिलीप इंदुरकर (वुड क्राफ्ट) हे प्रदर्शनीत सहभागी होतील. हे सारे बघायला मिळणार आहे.

ऐतिहासिक वस्तू आणि बरेच काही…

डॉ. अनिल मेश्राम (पुरातन वस्तूंचे संग्रह), अनन्या गोंडाणे (नाणी संग्रह), प्रशांत बैतुले (बांबू आर्ट), चंद्रकांत वर्मा (भारतीय चलनी फँसी नंबर नोटांचा संग्रह), हितेश डग (ऐतिहासिक वस्तू, शस्त्रे संग्रह), प्रज्योत पालिमकर (ओरोगामी जपानी आर्ट), रंजना कळंबे (शंख, शिंपले संग्रह), कविता बेदरकर (ऐतिहासिक शेवटचे टेलिग्राम संग्रह), अनिता सुधाकर सारडे (भारतातील विविध ठिकाणची मृदा संग्रह), सिद्धेस नागपुरे (अधू-अंध मूर्तिकार), मकरंद बेदरकर (अद्भुत संख्या रेल्वे तिकीट संग्रह), फत्तुजी सोनवाने (जागतिक देशांच्या नोटांचा संग्रह), अजय चौधरी (अक्षरातून गणेश निर्मिती आर्ट), शंकरराव मुर्कीकार (नाणे संग्रह), कांचन यारवानी (पेंटिंग आणि स्पोर्ट्स), निकिता वर्मा (कॅनव्हास पेंटिंग), अनंत पाठक (भारतीय डाक स्टेशनरी), अरव गोंडाणे (फर्स्ट डे कव्हर) आदी सर्व आपल्या अफलातून संग्रहांसह प्रदर्शनीत सहभागी होतील.

Nagpur Youth | जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित, कुणाला आणि कसा करता येईल अर्ज?

Nagpur Campaign | रविवारपासून पल्स पोलिओ अभियान, नागपूर महापालिकेने काय केली तयारी?

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी विमानाने आणणार, राजनाथ-गडकरी यांची चर्चा; लिस्ट तयार!