Nagpur Campaign | रविवारपासून पल्स पोलिओ अभियान, नागपूर महापालिकेने काय केली तयारी?

रेल्वे, बसेस, मेट्रो येथेही प्रवासादरम्यान पोलिओचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मनपाचे आरोग्य विभाग, रेल्वे आरोग्य विभागाद्वारे कार्यवाही करावी. शहरातील ज्या घरातील बालकांचे लसीकरण झाले अशा घरांवर आणि बालकांच्या बोटांवरही खुणा कराव्यात, असे निर्देश वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दिलेत.

Nagpur Campaign | रविवारपासून पल्स पोलिओ अभियान, नागपूर महापालिकेने काय केली तयारी?
नागपुरात टास्क फोर्सच्या बैठकीत उपस्थित अधिकारी.
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 4:00 AM

नागपूर : नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे (Health Department) पोलिओ निर्मूलनासाठी (Polio Eradication) 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीमध्ये पल्स पोलिओ अभियान राबविण्यात येत आहे. पोलिओचे शंभर टक्के लसीकरण व्हावे, कुणीही बाळ लसीकरणापासून अलिप्त राहू नये. यासंदर्भात नियोजनाबाबत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (Municipal Commissioner Radhakrishnan) यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात झालेल्या बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डब्ल्यू.एच.ओ.चे सर्व्हिलियन्स मेडिकल ऑफिसर डॉ. मो. साजीद यांच्यासह शहरातील विविध शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी, मनपाचे सर्व झोनल आरोग्य अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्व बालकांचे व्हावे लसीकरण

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपूर्ण शहरात व्यापक प्रमाणात राबविली जावी. यासंदर्भात प्रारंभी एच.ओ.चे सर्व्हिलियन्स मेडिकल ऑफिसर डॉ.मो. साजीद यांनी संपूर्ण अभियानाची माहिती दिली. शहरातील शाळा, आंगणवाडी येथे मुख्याध्यापकांशी संपर्क साधून त्यांच्या समन्वयातून लसीकरण अभियान राबविले जाईल. बांधकाम क्षेत्र व अन्य ठिकाणी मजुरी करणाऱ्या वर्गातील बाळांचेही लसीकरण व्हावे यासाठी सर्वत्र कार्यवाही करण्याबाबत यावेळी निर्देशित करण्यात आले. मनपाच्या सर्व झोन स्तरावर झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचा-यांसह आशा सेविकांच्या माध्यमातून लसीकरण अभियान राबवावे.

टास्क फोर्समध्ये विविध विभागांचा सहभाग

टास्क फोर्स समितीच्या बैठकीत ए.आय.पी.आय., सी.जी.एच.एस., मध्य रेल्वे हॉस्पिटल वरिष्ठ मंडळ, रोटरी ३०३ क्लब, ई.एस.आय.एस. हॉस्पिटल, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल, डब्ल्यू.सी.एल. हॉस्पिटल, ई.सी.एस. रेल्वे पॉलिक्लिनिक, संरक्षण आस्थापना विभाग, बालविकास प्रकल्प अधिकारी, शिक्षणाधिकारी मनपा, सहायक संचालक नगररचना, परिवहन विभाग मनपा, बी.एस.एन.एल., ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन, मेट्रो रेल्वे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, क्रीडा अधिकारी, लोककर्म विभाग, पोलीस संचालक कार्यालय, समाजविकास अधिकारी, सहायक आयुक्त कामगार, नॅशनल कॅडेटकोर, नेहरू युवा केंद्र संघटन, नॅशनल सर्व्हिस स्कीम, आदिवासी विकास विभाग, स्मार्ट सिटी, डब्ल्यू.एच.ओ., युनिसेफ, यूएनडीपी, बीएमजीएफ, जेएसआय, सीएचएएल, आयपीई ग्लोबल, लॉयन्स, रोटरी आदींच्या प्रतिनिधींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Russia Ukraine Crisis : जगाला अणु युद्धाचा धोका! रशियाच्या यूक्रेनवरील हल्ल्यातनंतर माजी NATO चीफ यांचा इशारा

Russia-Ukraine war: ‘या’ मुद्यावरुन तुम्हाला कळेल रशिया आणि युक्रेनमध्ये का युद्ध सुरु आहे ते?

Ukraine Russia War: रशियाचा युक्रेवर हल्ला, युद्ध आणखीन पेटण्याचा धोका, असंख्य बेघर, शेकडो जखमी!

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.