Nagpur Crime | प्रियकराने प्रेयसीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या; तिची मात्र पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Jan 30, 2022 | 12:10 PM

सुनीलने 30 नोव्हेंबर 2021 रोजी तिला भिवापूर येथे बोलावले. दुपारी घरी कुणीच नसल्यानं त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अनेकदा त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. सुनील आपल्याशी लग्न करेल, असं तिला वाटलं. पण, तसे काही झाले नाही.

Nagpur Crime | प्रियकराने प्रेयसीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या; तिची मात्र पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?
कारधा पोलीस ठाणे
Follow us on

नागपूर : संबंधित युवती ही अठरा वर्षांची आहे. ती मूळची भंडारा जिल्ह्यातील (Bhandara district). शिक्षण घेण्यासाठी सुनील सावसाकडे हा भंडाऱ्यात गेला होता. सुनील हा मूळचा भिवापुरातील दिघोरा (Dighora in Bhivapura) वस्तीत राहणारा. दरम्यान, या दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सुनीलने 30 नोव्हेंबर 2021 रोजी तिला भिवापूर येथे बोलावले. दुपारी घरी कुणीच नसल्यानं त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अनेकदा त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. सुनील आपल्याशी लग्न करेल, असं तिला वाटलं. पण, तसे काही झाले नाही. ती गरोदर राहिली. सुनीलने तिला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या. डिसेंबर 2021 रोजी तिने अठरा वर्षे पूर्ण केली. त्यामुळं तू माझ्याशी लग्न कर, असा तगादा तिने लावला. पण, सुनीलने त्याकडे दुर्लक्ष केले. लग्नास नकार (Refuse marriage) दिला. त्यामुळं संबंधित युवती कारधा पोलिसांत गेली. तिने त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली.

न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची कोठडी

प्रकरण भिवापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. प्रेयसीच्या तक्रारीवरून भिवापूर पोलिसांनी सुनीलविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. सोमवारी रात्री त्याला अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात सहायक महिला पोलिस निरीक्षक खोब्रागडे तपास करीत आहेत. अत्याचार व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं सुनील आता अडचणीत आला आहे.

वाडीतून विद्यार्थिनीचे अपहरण

दुसऱ्या एका घटनेत, वाडी येथील सतरा वर्षीय मुलगी गुरुवारी कॉलेजला जाण्यासाठी निघाली. ती सांयकाळपर्यंत घरी परत आलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. अज्ञात आरोपींनी तिला फूस लावून पळविले असावे, असा तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलीस तपास करीत आहेत. मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा पोलिसांत नोंदविण्यात आला आहे.

Corona | आम्हाला 50 हजारांची मदत कधी मिळणार?; नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचा प्रश्न

प्रधान सल्लागारानेच सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे उडविली; मुख्यमंत्री उत्तर देणार काय?, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

Nagpur | पतंग खेळताना अक्रित घडलं, 12 वर्षीय मुलाचा दुमजली इमारतीवरुन पाय घसरला अन्….