यशस्वी अँजियोप्लास्टीनंतर पीआरपी नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर

| Updated on: Sep 28, 2021 | 5:01 PM

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी मंगळवारी दिली.

यशस्वी अँजियोप्लास्टीनंतर पीआरपी नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर
प्रा. जोगेंद्र कवाडे
Follow us on

नागपूर : लाँगमार्च प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी मंगळवारी दिली. (After successful angioplasty, PRP leader Jogendra Kawade’s condition is stable)

शनिवारी प्रकृती अस्वस्थतेमुळे जोगेंद्र कवाडे यांना रामदासपेठ येथील अरनेजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. विविध तपासण्याअंती मिळालेल्या निष्कर्षानंतर ह्रदयातील ब्लॉकेजेसमुळे कवाडे यांच्यावर अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. जसपाल अरनेजा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची एक विशेष टीम कवाडे यांच्यावर उपचार करीत आहे. शस्त्रक्रियेनंतर प्रा.कवाडे यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांना ते उत्तम प्रतिसाद देत आहेत.

उपचारांनंतर लवकरच ते संघटना कार्यात नव्या ऊर्जेने रूजू होतील, अशी माहिती जयदीप कवाडे यांनी दिली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच संघटनेचे प्रेम आणि आशिर्वाद कवाडे सरांच्या पाठिशी असल्याने ते लवकर ठणठणीत बरे होतील, असे जयदीप कवाडे म्हणाले.

99 टक्के ब्लॉकेज

रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्वप्रथम अँजियोग्राफी करण्यात आली. यात 99 टक्के ब्लॉकेज आढळून आल्याचे समाजताच डॉ. जसपाल अरनेजा यांनी जयदीप कवाडेंशी चर्चा करून अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचे सुचवले होते.

इतर बातम्या

PHOTO: मराठवाड्यात पावसाचे थैमान, पूराचे पाणी गावात शिरले, पिकंही वाहून गेली, दोरखंडाला धरून जीवघेणा प्रवास

आधी राणे म्हणाले, मुख्यमंत्री आलेच पाहिजेत असं काही नाही, आता चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्तेच, राणे-ठाकरे एकाच मंचावर

डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर अवघ्या 12 तासात खड्डे; चार अभियंत्यांच्या निलंबनानंतरही ठाणे पालिकेचा भोंगळ कारभार सुरूच

(After successful angioplasty, PRP leader Jogendra Kawade’s condition is stable)