Video | केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय, Sanjay Raut यांचा भाजपवर निशाणा

| Updated on: Mar 22, 2022 | 1:52 PM

भाजपचं राज्य नसणाऱ्या ठिकाणीचं ईडीची कारवाई होते. सात वर्षात तेवीस हजार धाडी पडल्या. महाराष्ट्र, बंगालमध्ये सत्ता पाडू, असं भाजपचं स्वप्न आहे. पण, आम्ही वाकणार नाही, मोडणारही नाही. आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

Video | केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय, Sanjay Raut यांचा भाजपवर निशाणा
नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत.
Follow us on

नागपूर : खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे नागपुरात आलेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षाच्या संपर्कासाठी मराठवाडा, विदर्भात (Marathwada, Vidarbha) आल्याचे सांगितलं. ईडीच्या कारवायांबद्दल राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय. मध्यमवर्गीय व्यक्तीवर आक्षेप घेण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होतात. अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना इडीनं दिल्लीत बोलावलं. मी झुकणार नाही, असं बॅनर्जी म्हणाले. हा राजकीय गैरवापर होतो. भाजपचं राज्य नसणाऱ्या ठिकाणीचं ईडीची कारवाई होते. सात वर्षात तेवीस हजार धाडी पडल्या. महाराष्ट्र, बंगालमध्ये सत्ता पाडू, असं भाजपचं स्वप्न आहे. पण, आम्ही वाकणार नाही, मोडणारही नाही. आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

विदर्भ, मराठवाड्यात संवाद

खासदार राऊथ म्हणाले, पत्रकार परिषदेला पाच दहा हजार लोकं असतात. शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू आहे. विदर्भ-मराठवाडा येथे शिवसेनेच्या खासदारांनी जावं, संवाद साधावा, हा यामागचा उद्देश आहे. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जात आहे. माझ्या बाजूला रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आहेत. खासदार राहुल शेवाडे हे गडचिरोलीला जाणार आहेत. तिथं ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. संसदेचे अधिवेशन सुरू असल्यानं राष्ट्रीय नेते दिल्लीत आहेत.

पाहा व्हिडीओ काय म्हणाले, संजय राऊत

आमचा पक्ष आम्ही वाढविणार

राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. शिवसेना ही प्रमुख राजकीय संघटन आहे. संघटन ही शिवसेनेची खरी ताकद आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त शिवसेना देशाच्या राज्यात टिकून आहे. हे मजबूत संघटन आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत आहोत. येणाऱ्या काळात शिवसेनेने ताकदीनं काम करावं. जिथं शिवसेना लढली नाही तिथंल्या कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करावं. यासाठी दौरा आहे. नागपूर विदर्भातील मुख्य शहर आहे. उपराजधानी आहे. येथे आमचा पक्ष आम्ही वाढविणार आहोत. हा अधिकार आम्हाला आहे. जुन्या लोकांना पक्षाशी जोडण्यासाठी आलो आहे.

Wardha ACB | घरकुलाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी लाचेची मागणी, 15 हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास अटक

Nagpur NMC | एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग रचना करा, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Sanjay Raut फडणवीसांच्या गडात, नागपुरात सेनेचं शिवसंपर्क अभियान, शिवसेनेची चाचपणी