मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पुढे यावे, मनपाचे आवाहन : निवडणूक आयोगाद्वारे विशेष सवलत

| Updated on: Nov 18, 2021 | 1:35 PM

मतदार नोंदणीसाठी दिव्यांग, तृतीयपंथींकरिता वय, पत्ता याबद्दल अडचणी आहेत. हे लक्षात घेता आवश्यक दस्तऐवजाबाबत भारत निवडणूक आयोगाद्वारे विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर शहरातील सर्व दिव्यांगांसह तृतीयपंथींनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पुढे यावे, मनपाचे आवाहन : निवडणूक आयोगाद्वारे विशेष सवलत
Follow us on

नागपूर : महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. नागपूर शहरातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांचे नावही मतदार यादीमध्ये समाविष्ठ करण्यात येत आहे.

दिव्यांग, तृतीयपंथींसाठी सवलत

मतदार नोंदणीसाठी दिव्यांग, तृतीयपंथींकरिता वय, पत्ता याबद्दल अडचणी आहेत. हे लक्षात घेता आवश्यक दस्तऐवजाबाबत भारत निवडणूक आयोगाद्वारे विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर शहरातील सर्व दिव्यांगांसह तृतीयपंथींनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

भारतीय संविधानाने १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला ‘मताधिकार’ बहाल केलेला आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या मताला समान महत्व असल्याने मताधिकार ही मोठी ताकद आहे. मात्र यासाठी सर्वप्रथम मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. याबाबत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी विशेष पीडब्ल्यूडी ॲप

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी विशेष पीडब्ल्यूडी या ॲपची सोय केलेली आहे. या ॲपवरून दिव्यांग मतदारांना नाव नोंदणी करता येईल. ज्यांचे आधीच नाव नोंदणी झालेली आहे पण दिव्यांग म्हणून नोंद नसेल त्यांना या ॲपवरूनच दिव्यांगत्व चिन्हांकित करण्याची सोय आहे. शहरातील दिव्यांगांनी पुढे येऊन पीडब्ल्यूडी या ॲपद्वारे आपली मतदार नोंदणी आणि दिव्यांगत्व चिन्हांकित करून घ्यावे, असे आवाहन मनपाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

मतदार नोंदणी मनपाची विशेष मोहीम

नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या पेजवरून नागपूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्हिडिओद्वारे मतदार नोंदणीसाठी आवाहन करीत आहेत. आतापर्यंत ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, पर्यावरणवादी जेरील बानाईल, द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक विजय मुनीश्वर, आंतरराष्ट्रीय धावपटू प्राजक्ता गोडबोले, टिथ आर्चर अभिषेक ठावरे यांनी व्हिडिओद्वारे नागपूर शहरातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आवाहन केले आहे.

खासदार कृपाल तुमानेंची जीभ घसरली, म्हणाले, कंगना राणावतला मीडियानं महत्त्व देऊ नये, ती हलकट बाई

कुरिअर उघडताच सावधान! नागपुरात चक्क कुरिअरमधून विषारी कोब्य्राचं पार्सल, कुणाला संपवण्याचा घाट?