…तर काँग्रेस ही चूक वारंवार करेल; नाना पटोले असं का म्हणालेत?

| Updated on: Mar 26, 2023 | 11:49 AM

जे भाजपमध्ये प्रवेश करतात, त्यांना गुजरातच्या निरमा पावडरमध्ये धुतले जाते. भाजपची हुकूमशाही प्रवृत्ती आहे. त्यांना वाटते ते सत्तेचा ताम्रपट घेऊन आले आहेत.

...तर काँग्रेस ही चूक वारंवार करेल; नाना पटोले असं का म्हणालेत?
Follow us on

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले मित्र अडाणी यांना कशी मदत करतात. यासंदर्भात राहुल गांधी लोकसभेत खुलासा करणार होते. म्हणूनच त्यांची सदस्यता रद्द करण्यात आली. असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय. हे भाजपनेच घडवून आणलंय. फक्त कोर्टाचं नाव पुढं केलं आहे, असंही ते म्हणाले. मी गावगुंड मोदी संदर्भात बोललो, तरी ते मोदी यांना टोचलं. जेव्हा तो गाव गुंड आणि त्ंयाची पत्नी समोर आली तेव्हा भाजपचं आंदोलन थांबलं. अडाणी यांचे नाव घेतले तर यांना त्रास का होतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही तर यांना काय घाबरणार. भाजप विरोधातला आंदोलन आणखी तीव्र करणार. भाजपच्या हुकूमशाही विरोधात आजपासून आम्ही सत्याग्रह आंदोलन करू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

त्यांना निरमा पावडरमध्ये धुतले जाते

राहुल गांधी यांच्या प्रकरणात भाजप वारंवार सांगते. राहुल गांधी यांनी माफी मागितली असती, तर प्रकरण थांबले असते. सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती. त्याची अनेक कागदपत्र समोर आहेत. इंग्रजांकडून सावरकरांना साठ रुपये महिना का मिळत होता, असंही त्यांनी म्हंटलं.

जे भाजपमध्ये प्रवेश करतात, त्यांना गुजरातच्या निरमा पावडरमध्ये धुतले जाते. भाजपची हुकूमशाही प्रवृत्ती आहे. त्यांना वाटते ते सत्तेचा ताम्रपट घेऊन आले आहेत. चोराला चोर म्हणणे चुकीचे असेल. तर काँग्रेस ही चूक वारंवार करेन. असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

लोकांच्या मनात प्रचंड राग

इंदिरा गांधी यांची ही सदस्यता रद्द करण्यात आली होती. गांधी नावाची या देशांमध्ये मोठी ताकद आहे. कुटुंबातील लोकांवर अन्याय होतो. देशाची जनता न्याय देते. भाजप विरोधात लोकांमध्ये प्रचंड राग आहे. जनता, शेतकरी, बेरोजगार तरुण, मागासवर्गीय यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका पटोले यांनी केली.

यांच्यात संघर्ष सुरू

देशाचे पंतप्रधान आणि कायदामंत्री खोटे बोलण्यामध्ये पटाईत आहेत. न्यायाधीशांची नियुक्ती आम्हीच करणार असा त्यांचा हट्ट आहे. त्यामुळे सरकार आणि न्यायव्यवस्थेत संघर्ष सुरू आहे. हे संपूर्ण जग पाहत आहे. आता असे म्हणत असतील की आमच्यात कोणतेही संघर्ष नाही, तर ते मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून खोटं बोलत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.