दोन मोटारसायकल समोरासमोर धडकल्या; १२ वर्षांचा राकेश निपचित पडला, त्यानंतर…

दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यात पिता-पुत्र जखमी झाले. मुलगा १२ वर्षांचा होता. तो घटनास्थळी निपचित पडला. एक युवक देवदुतासारखा धावून आला.

दोन मोटारसायकल समोरासमोर धडकल्या; १२ वर्षांचा राकेश निपचित पडला, त्यानंतर...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 10:49 AM

नंदुरबार : रस्त्यावर कधीकधी अपघात होतात. योग्यवेळी जखमींवर उपचार झाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. पण, प्रत्येकवेळी कुणीही मदतीला येईल, असं नाही. कधी-कधी काही जण अपघातानंतर वेळीच धाऊन येतात. तर कधीकधी जखमी रस्त्याच्या बाजूला पडला असतो. पण, कुणीही मदतीला येत नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. पण, नवापूरमध्ये झालेल्या अपघातात चांगला अनुभव आला. दोन मोटारसायकली समोरासमोर धडक झाली. यात पिता-पुत्र जखमी झाले. मुलगा १२ वर्षांचा होता. तो घटनास्थळी निपचित पडला. एक युवक देवदुतासारखा धावून आला.

मुलाच्या डोक्याला मार

नवापूर तालुक्यातील खांडबारा नंदुरबार रस्त्यावर खांडबारा वाटवी दरम्यान दोन मोटरसायकलीच्या भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर पिता-पुत्र दोघे गंभीर जखमी झाले. त्यात आयुष राकेश गावित अंदाजे वय बारा हा लहान मुला गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेला होता. त्याच्या डोक्यावर मार लागल्याने रक्तस्राव सुरू होता. त्याचवेळी तेथून मोटरसायकल घेऊन जात असलेला अल्तामस बेलदार युवक धाऊन आला.

हे सुद्धा वाचा

अॅम्बुलस्नची वाट पाहिली नाही

ॲम्बुलन्सची वाट न बघता सदर मुलाला उचलून मोटरसायकलने खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. आयुष राकेश गावित या लहान मुलाचे प्राण वाचले. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर मदत करण्यासाठी अनेक बोर्ड लावले जातात. तरीही काही लोक मदत करण्याऐवजी गंमत बघतात.

अल्तमासचे सर्वत्र कौतुक

असे न करता अपघात झाल्यावर मदत करणे हे गरजेचे आहे. क्षणाचीही वाट न बघता वेळेवर लहान मुलाला अल्तामस बेलदार या युवकाने मोटरसायकलने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. त्यामुळे अल्तामसचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

जखमी मुलाला वेळेवर उपचार मिळाले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. थोडासा उशिरा झाला असता तर वाईट बातमी समोर येऊ शकली असती. अत्तमासने वेळेवर योग्य निर्णय घेतला. मागे एका युवकाला बसवले. जखमीला थेट रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी वेळेवर उपचार केले. त्यामुळे त्याचा जीव वाचला.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.