Devendra Fadnavis: नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेणार? त्या व्हिडिओबाबत सर्वात मोठा खुलासा, मुख्यमंत्री म्हणाले काय?

Devendra Fadnavis on Narhari Zirwal Video Case: राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या व्हिडिओसंदर्भात मोठा खुलासा समोर आला आहे. त्यामुळे झिरवळ यांच्या अडचणी वाढतात की ते याप्रकरणात विकेट पडता पडता वाचतात हे लवकरच समोर येईल.

Devendra Fadnavis: नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेणार? त्या व्हिडिओबाबत सर्वात मोठा खुलासा, मुख्यमंत्री म्हणाले काय?
देवेंद्र फडणवीस, नरहरी झिरवळ
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 27, 2026 | 3:11 PM

Devendra Fadnavis on Narhari Zirwal Viral Video : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडिओने समाज माध्यमांवर संतापाचे वातावरण आहे. एका ट्रान्सवुमनसोबत त्यांचे चित्रिकरण करण्यात आल्याचे दिसते. पवन यादवचा भाऊ रवी यादव यानेच हे प्रकरण समोर आणल्याने राष्ट्रवादी पक्ष पुन्हा अडचणीत सापडला. तर मंत्री नरहर झिरवळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून एक मोठा खुलासा केला आहे. तर झिरवळांच्या राजीनाम्याविषयी मुख्यमंत्र्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

झिरवळांचा राजीनामा घेणार?

नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडिओप्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. “नरहरी झिरवळ यांनी मला फोनवरून माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं आहे की, हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही तात्काळ तक्रार दाखल करा. या व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल. त्याची सत्यता पाहण्यात येईल. त्यानंतर झिरवळ यांच्या राजीनाम्याबाबत त्यांच्या पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मी योग्य निर्णय घेऊ.” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे झिरवळांच्या राजीनाम्याबाबतचा सस्पेन्स उरला नसल्याचे समोर येत आहे. त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाहक रांगा लावू नका

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. पेट्रोल डिझेलवर एक्साईज ड्युटी १० रुपये प्रति लिटरनं कमी केली आहे. सामान्य ग्राहकांना अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावे लागणार नाही. आजूबाजूच्या देशात जवळपास शटडाऊनची स्थिती आहे. पाकिस्तान श्रीलंका यांनी ऑफिसेस बंद केले आहेत. अशावेळी भारताने उत्तम मॅनेजमेंट केलंय. घरगुती गॅस आणि इतर कुठेही कमतरता होऊ दिली नाही. सर्वांना विनंती करतो विनाकारण अफवावरुन रांगा लावू नये. विनाकारण रांगा लावल्या तर सप्लायवर ताण येतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते. जसं पेट्रोल डिझेल भरतो तसंच आपण भरावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .

अफवा पसरवण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई

आपलं कमर्शिअल गॅस सिलेंडर आता ४० टक्के करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता तो ५० टक्के देखील जाणार आहे. अशात रिलिफ लोकांना मिळणार आहे. लॉकडाऊन लागणार नाही केंद्र सरकारने जाहीर केलंय. अफवा पसरवण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. व्हॉट्सॲपवर जरी तुम्ही असे मॅसेज फॉरवर्ड केले तरी ते गुन्हा ठरणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. खोट्या अफवा पसरवून नका अन्यथा कायदेशीर कारवाई होईल, असे त्यांनी बजावले.

खरातप्रकरणात अजून कारवाई

भोंदूबाबा अशोक खरात याच्याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मोठी अपडेट दिली. पहिल्यांदा त्यांचे फोटो व्हीडिओ येतात, यावरुन गोष्टी डिटरमिन करता येणार नाही.सहभाग असेल तर कारवाई होईल.कोणालाच सोडण्याचे कारण नाही, येत्या काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे. आर्थिक फसवणूक झाली म्हणून लोकं पुढे येत आहेत. ह्या प्रकरणात दुर्दैवी महिला व्हीक्टिम आहेत, त्यांचे व्हीडिओ सोशल मीडिया साईटवर टाकले आहेत. अपलोड केले असतील व्हीडिओ तर कारवाई होईल. गोपनीयता यातील भंग करण्यात येत आहेत, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

Follow Us