Devendra Fadnavis : फाळणीतील बाधितांचे देशाच्या विकासात मोठे योगदान, देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाची फाळणी दुःखद घटना…

| Updated on: Aug 15, 2022 | 1:30 AM

स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्यांचे स्मरण म्हणून आणि देशाच्या वाटचालीत आपले योगदान म्हणून प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावावा, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis : फाळणीतील बाधितांचे देशाच्या विकासात मोठे योगदान, देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाची फाळणी दुःखद घटना...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाची फाळणी दुःखद घटना...
Follow us on

नागपूर : आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरे करीत आहोत. स्वातंत्र्याच्या या उत्सवासाठी अनेकांनी आपले प्राणार्पण करून योगदान दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास देशाची फाळणी अत्यंत दु:खद घटना म्हणून नोंद आहे. फाळणीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली. त्या जुन्या जखमा वेदनादायी असल्या तरी फाळणीमुळे सर्वाधिक बाधित झालेल्यांचे योगदान मात्र देशाच्या विकासात मोठे आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अखिल भारतीय सिंधी समाज (Indian Sindhi Society) आणि जरीपटका दुकानदार संघ (shopkeepers Association) यांच्या सहकार्याने जरीपटका येथील जिंजर मॉलमध्ये (Ginger Mall) देश विभाजनाच्या आठवणींचा उजाळा देणा-या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे औपचारिक उद्धाटन रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

जनतेचा उत्सव व्हावा

देशाच्या विभाजनावर श्री. वीरेंद्र कुकरेजा यांच्यामार्फत तयार करण्यात आलेले व्हिडिओ दाखविण्यात आले. यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले, गोळ्या झेललेले आणि विभाजनामध्ये ज्यांचे घरदार हिरवून घेतले गेले. अशा सर्वांना आपण विसरू शकत नाही. विभाजनाच्या जखमा आजही वेदनादायी आहेत. सिंध, पंजाब प्रांतातील लोकांनी सर्वाधिक झळ पोहोचली. मात्र एवढ्यावरही या नागरिकांनी देशप्रेम कमी होऊ दिले नाही. देशाच्या विकासात योगदान देत एक भारत श्रेष्ठ भारत हा नारा बुलंद केला. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता जनतेचा उत्सव व्हावा. जनता आणि समाजाला स्वातंत्र्याचे महत्व कळावे, यासाठी त्यांचा या महोत्सवामध्ये सहभाग असणे आवश्यक असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.

प्रत्येकाने घरावर तिरंगा लावावा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाने स्वातंत्र्य संग्राम सेनानी ज्यांचे नाव अद्यापही पुढे आलेले नाही. त्यांचे चरित्र समाजापुढे आणले आहे. याशिवाय स्वातंत्र्याचा इतिहासही पुढे आलेला आहे. 75 वर्षात भारताने एक मोठी भरारी घेतली आहे. आधी आपल्याकडे साधे पिन सुद्धा तयार होत नव्हते आज आपण विमानांची निर्मिती करीत आहोत. 100 पेक्षा जास्त देशांमध्ये शस्त्रास्त्र निर्यात करीत आहोत. संपूर्ण जगात आयटीमध्ये केवळ भारतीयांचा बोलबाला आहे. ही मागील 75 वर्षातील भारतातील उपलब्ध आहे. मात्र स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सव प्रसंगी पुढील 25 वर्षात भारत कुठे राहील, यादृष्टीनेही संकल्प करण्याची गरज आहे. एकूणच आयडिया, इनोव्हेशन आणि अॅक्शन प्रधानमंत्र्यांच्या या मंत्रानुसार कार्य करण्याची गरज असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा