Video Nagpur Congress : सोनिया गांधींविरोधात ईडी कारवाई, नागपुरात काँग्रेसपाठोपाठ युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, केंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी

| Updated on: Jul 27, 2022 | 5:24 PM

नागपुरात आज ईडीच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. युवक काँग्रेसने दुपारी अचानक आंदोलन करण्याचा इशारा दिला. याठिकाणी पोलीस तैनात होते.

Video Nagpur Congress : सोनिया गांधींविरोधात ईडी कारवाई, नागपुरात काँग्रेसपाठोपाठ युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, केंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी
नागपुरात काँग्रेसपाठोपाठ युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक
Follow us on

नागपूर : नागपुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीविरोधात आजही आंदोलन केलं. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडी चौकशी सुरू आहे. याचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यादरम्यान पोलिसांकडून (Police) कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. नरेंद्र मोदी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. सोनिया गांधी, राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तु्म्हारे साथ हैं च्या घोषणा देण्यात आल्या. कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्या नेतृ्त्वात हे आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी देत होते. केंद्रसरकारचा (Central Govt) निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी डोक्याला काळ्या पट्ट्या लावल्या होत्या.

पाहा व्हिडीओ

कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची

आज ईडीच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. युवक काँग्रेसने दुपारी अचानक आंदोलन करण्याचा इशारा दिला. याठिकाणी पोलीस तैनात होते. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते याठिकाणी दाखल झाले. ईडी कार्यालयाजवळ जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. धक्काबुक्कीसुद्धा याठिकाणी झाली. कार्यकर्ते जोरदार नारेबाजी करत होते.

हे सुद्धा वाचा

युवक काँग्रेस आक्रमक

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस ईडी कार्यवाहीविरोधात आक्रमक झाली. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. राज्यातील बहुतेक सर्व काँग्रेसचे नेते या ईडी विरोधात रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळते. सोनिया गांधी यांची यापूर्वी दोनदा चौकशी झाली. आता पुन्हा आज चौकशी सुरू असल्यानं काँग्रेसनं ठिकठिकाणी आंदोलन केलं. यानिमित्त काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालेत.

कुणाल राऊत यांचे नेतृत्व

युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढल्याचं चित्र दिसत होतं. काँग्रेसपाठोपाठ युवक काँग्रेस आक्रमक झालेले दिसून येतात. आज आम्ही मूक प्रदर्शन करत होतो. पोलिसांनी आम्हाला जबरजस्ती गाडीत टाकलं. हे योग्य नाही, असंही कुणाल राऊत यांनी सांगितलं. कितीही कारवाई करा, आम्ही झुकणार नाही, असं युवक काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणाले.