नागपूर मनपाचा शिक्षण विभाग झोपेत, विद्यार्थ्यांना अद्याप बसच्या पासेस नाहीत, मनपा शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

| Updated on: Sep 14, 2022 | 1:12 PM

गेल्या तीन महिन्यांपासून पालकं स्वतः शाळेत विद्यार्थ्यांना नेऊन देतात. किंवा पैसे देऊन बसने किंवा ऑटोने शाळेत पाठवितात. तीन महिने झाले. शाळेत जाण्या-येण्यासाठी पैसे लागत असल्यामुळं काही विद्यार्थी शाळेला बुट्टी मारतात. याला सर्वस्वी शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

नागपूर मनपाचा शिक्षण विभाग झोपेत, विद्यार्थ्यांना अद्याप बसच्या पासेस नाहीत, मनपा शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
मनपा शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
Image Credit source: t v 9
Follow us on

दिल्लीतील शिक्षण व्यवस्था सुधारली. म्हणून दिल्ली मनपा (Municipality) शाळेत विद्यार्थ्यांच्या रांगा लागत आहेत. पण, नागपूर मनपातील शाळांची अवस्था अतिशय खराब आहे. त्यामुळं विद्यार्थी (Students) मनपाच्या शाळेत येत नाहीत. काही शाळा तर खंडार अवस्थेत आहेत. ती भयावह शाळा पाहून तिथं सहसा विद्यार्थी जात नाहीत. पण, गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळतं म्हणून काही मोजके विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेण्यासाठी जातात. आपल्याला विद्यार्थी मिळावेत, आपली नोकरी टिकावी, असा शिक्षक, मुख्याध्यापकांचा (Principal) प्रयत्न असतो. विद्यार्थी मिळावेत, यासाठी ते नानाविध आमिष दाखवितात.

मोफत पास योजनेचा बोजवारा उडाला

मनपा शाळेत विद्यार्थी यावेत, म्हणून त्यांना मनपाच्या शिक्षण विभागातर्फे मोफत पास दिली जाते. त्यासाठी काही प्रक्रिया पार पाडावी लागते. शाळा सुरू होऊन तीन महिने झाले. तरी अद्याप विद्यार्थ्यांना पास मिळाली नाही. त्यामुळं शाळेत येण्यासाठी त्यांना खूप धडपड करावी लागते. प्राप्त माहितीनुसार, दुर्गानगर शाळेत दूरवरून 12 विद्यार्थी येतात. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी बसची पास मिळावी, यासाठी अर्ज केला. 15 ऑगस्टपूर्वी हे अर्ज शाळेचे शिक्षण श्रीकांत गडकरी यांच्याकडं देण्यात आले. त्यांना त्यावेळी विचारणा केली असता पासच्या प्र्क्रियेला आणखी 15 दिवस लागतील, असं मुख्याध्यापिकेसमोर सांगितलं.

दुर्गानगर शाळेसमोर असे मोकाट कुत्रे असतात. विद्यार्थ्यांचा चावा घेतल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.

सरकारी काम तीन महिने थांब

सरकारी काम आहे. त्यामुळं पास मिळेपर्यंत वेळ लागेल, असं श्रीकांत गडकरी यांचं म्हणणं होतं. बऱ्याच प्रक्रियेतून गेल्यानंतर ही पास परिवहन विभागाकडून मिळत असल्याचं ते म्हणाले. 15 सप्टेंबरपर्यंत ते टोलवाटोलवीची उत्तरं देत होते. आज पुन्हा विचारणा केल्यावर त्यांनी एक सहकारी पासच्या कामानिमित्त पाठविल्याचं सांगितलं. तरीही अजून आठवडा पास मिळण्यासाठी लागेल, असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरित शाळा सुरू होऊन आता तीन महिने झालेत. तरीही अजून पास न मिळाल्यानं काही विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसल्याचं चित्र आहे.

हे सुद्धा वाचा

साधारण पासची प्रक्रिया काय

पाच रुपयांना आपली बसचा फार्म मिळतो. शाळेची बोनाफाईड सर्टिफिकेट व फोटो दिल्यानंतर मासिक किंवा सहामाही पास एका दिवसात विद्यार्थ्याला मिळते. त्यासाठी संबंधित शुल्क पालक किंवा विद्यार्थ्यांना द्यावे लागते. अशी माहिती परिवहन विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली. पण, मनपा शाळेत विद्यार्थी यावेत, यासाठी ही पासची सुविधा मनपाचं शिक्षण विभाग मोफत देते. स्वतः आम्ही सर्व प्रक्रिया करून देतो, त्यासाठी शाळेला वेळ लागतो. असं दुर्गानगर शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे.

पैसे खर्च करून किती दिवस शाळेत येणार

मनपा शाळेत शिकणारा विद्यार्थी हा गरीब असतो. त्याच्या पालकांकडं शाळेत जाण्या-येण्यासाठी पैसे नसतात. गेल्या तीन महिन्यांपासून पालकं स्वतः शाळेत विद्यार्थ्यांना नेऊन देतात. किंवा पैसे देऊन बसने किंवा ऑटोने शाळेत पाठवितात. तीन महिने झाले. शाळेत जाण्या-येण्यासाठी पैसे लागत असल्यामुळं काही विद्यार्थी शाळेला बुट्टी मारतात. याला सर्वस्वी शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. बसची पास काढून देण्याचे खोटे आश्वासन आम्हाला का दिलं, असं पालकांचं म्हणणं आहे.