Gondia Crime | सालेकसा येथील पाच पोलीस निलंबित; पोलीस अधीक्षकांनी का उगारला कारवाईचा बडगा?

| Updated on: Jan 15, 2022 | 5:32 PM

खोट्या गुन्ह्यात अडकवल्या प्रकरणी सालेकसाचे पाच पोलीस निलंबित करण्यात आले. जप्ती केलेली दारू पोलीस रेकॉर्डवर कमी दाखवून 3 युवकांना फसविले होते. बनावट धाड टाकल्याचे प्रकरण पोलिसांना भोवले आहे.

Gondia Crime | सालेकसा येथील पाच पोलीस निलंबित; पोलीस अधीक्षकांनी का उगारला कारवाईचा बडगा?
सालेकसा पोलीस ठाणे
Follow us on

गोंदिया : जिल्ह्याच्या सालेकसा पोलीस ठाण्यातील पाच पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले. सालेकसा तालुक्यातील तीन लोकांवर अवैध दारू विक्रीची कारवाई केली होती. त्यांना बनावट गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकडण्याचा प्रकार या पोलिसांच्या अंगलट आला. स्वतः पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी या प्रकरणात पाच पोलिसांना निलंबित केले. या प्रकरणाने रक्षकच भक्षक झाल्याचे दिसून आले. सहायक पोलीस निरीक्षक अशोक धाबळे, पोलीस नायक प्रमोद सोनवणे, पोलीस नायक अनिल चक्रे, शिपाई संतोष चुटे, शिपाई मधू सोनी यांनी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

दारू ठेवायला देऊन केला गुन्हा दाखल

सालेकसा पोलीस ठाण्यातील पाच पोलिसांनी डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला देशी दारू पकडली होती. त्यापैकी काही पेटी दारू ही पोलीस रेकॉर्डला दाखवली. इतर 8 पेटी दारू या निलंबित पोलिसांनी आपल्या जवळील विशाल दासरिया, दीपक बासोने, भूषण मोहरे यांना दिली. त्यांनी चारचाकी वाहनाने 8 पेटी दारू ही सीलबंद केली. पोलिसांनी त्यांना काही दिवसाकरिता आपल्या जवळ ठेवण्यास सांगितले. या युवकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. ही दारू विशालने आपल्या शेतात लपवून ठेवली. दोन-तीन दिवसांनी पोलिसांनी विशालला फोन केला. एका अनोळखी इसमाला पाठवून आठ पेटींपैकी दोन पेटी दारू देण्यास सांगितले. विशालने त्या इसमास दोन पेटी दारू दिली. तो इसम जाताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. सहा पेटी दारू जप्त करून त्याला मारहाण केली. त्याच्यावर अवैध दारू विक्रीचा आरोप लावून गुन्हा दाखल केला. युवकांनी पोलिसांना समजाविण्याचा प्रयत्न केला. ही दारू आमची नाही पोलिसांची आहे. परंतु त्यांचे कोणी ऐकले नाही. त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली.

गृहमंत्र्यांकडे केली होती तक्रार

या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी युवकांनी गृहमंत्र्यांकडे धाव घेतली. मानवाधिकार आयोग आणि पोलीस अधीक्षक गोंदिया यांना पत्र लिहले. या प्रकरणाची माहिती देऊन न्यायाची मागणी केली. अखेर पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अहवाल सादर करण्यास सांगितले. त्या अहवालानुसार या प्रकरणी तपास करून सालेकसा पोलिसांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पाच जणांना निलंबित केले. कायद्याचे रक्षकच अशी फेक कारवाई करू लागले तर सामान्यांनी न्याय मागाल कुठे जावे हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे, असे मत पीडिताचा मुलगा विशाल दसरीया यांनी व्यक्त केले आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत सोमवारी न्यायालयात सुनावणी; वडेट्टीवार म्हणतात, वेळ वाढवून देण्याची मागणी करणार, कारण काय?

Nagpur Crime | एफआयआर दाखल करणार नाही म्हणून मागितली लाच; रामटेकचा वनपाल कसा अडकला एसीबीच्या जाळ्यात?

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचे तीन बळी, चिंता वाढली; बाधितांमध्ये पोलिसांची संख्या किती?