प्रवासी सुखावले! नागपूर आगारातून धावल्या 65 बसेस; बऱ्याच दिवसांनंतर झाली लाखोंची कमाई!

परिवहन महामंडळाचे दीड हजारांवर कर्मचारी अद्यापही संपावर आहेत. त्यामुळं एसटी प्रशासनाने एसएसके या खासगी कंपनीच्या चालकांकडून बस सुरू केल्या. त्यामुळं आता विभागातून लांब पल्ल्याच्या बसेसही धावू लागल्या आहेत. त्याला प्रवाशांचाही प्रतिसाद मिळत आहे. महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत आहे.

प्रवासी सुखावले! नागपूर आगारातून धावल्या 65 बसेस; बऱ्याच दिवसांनंतर झाली लाखोंची कमाई!
नागपूर बसस्थानक

नागपूर : विभागातून शुक्रवारी एकूण 65 बसेस धावल्यात. त्यापैकी 29 बस या खासगी चालकांकडून परिचालन केल्या गेल्या. शुक्रवारी गणेशपेठ 39, इमामवाडा 4 घाटरोड 5, उमरेड 3, सावनेर 5, वर्धमाननगर 6, काटोल 1 आणि रामटेक 2 अशा 65 बसेस धावल्यात. या बसेसने 17 हजार 224 किमीवरील 165 फेर्‍या केल्यात. यातून 5 हजार 729 प्रवाशांनी प्रवास केल्याने महामंडळाला 5 लाख 5 हजार 696 रुपयांचा महसूलही मिळाला. तर शुक्रवारी संपकर्त्यांपैकी केवळ 2 कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यातच खासगी चालकांच्या हाती एसटीची स्टेअरींग सोपवून प्रशासनाने संपकरी कर्मचार्‍यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

दर तासाला धावल्या बस

सावनेर आगारातील 5 चालक, 4 वाहक आणि गणेशपेठ आगारातील 4-4 चालक आणि वाहक तसेच एक यांत्रिकी कर्मचारी अशा 18 कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. यासोबतच एकूण बडतर्फ कर्मचार्‍यांची संख्या 160 वर पोहोचली असल्याचे नागपूर विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी सांगितले. नव्या वेळापत्रकानुसार गणेशपेठ येथून प्रत्येक एका तासाने विविध जिल्ह्यांकरिता बस धावणार असल्याची माहिती एसटीचे नागपूर विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली. संपकरी कर्मचार्‍यांना प्रशासनाने वारंवार कामावर हजर राहण्याची संधी दिल्या गेली. परंतु त्यानंतरही विभागातील 2377 कर्मचार्‍यांपैकी 1633 कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामध्ये चालक 679, वाहक 543, प्रशासकीय कर्मचारी 96 आणि कार्यशाळेतील 315 कर्मचार्‍यांनी उपोषणात भाग घेत संप करीत आहे. तर 93 कर्मचारी अधिकृत रजेवर असून प्रत्यक्ष कामावर 651 कर्मचारी आहे.

त्रिस्तरीय समितीच्या अहवालाची प्रतीक्षा

विलीनीकरण संदर्भात त्रिसदस्यीय समितीचा जो काही अहवाल येईल तो राज्य सरकार मान्य करणार आहे. कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात राज्य सरकारने भरीव वाढ केली आहे. तरी सुध्दा एसटी कामगारांचा संप सुरू असल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत आहे. संपामुळे महामंडळाचे दररोजचे लाखोंचे नुकसान होत आहे. नोटीस पाठविल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. तरी सुध्दा जे कामावर परतले नव्हते. अशा 176 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले असल्याचे बेलसरे यांनी सांगितले. नागपूर विभागातील संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना नोटीस पाठविल्यानंतर 32 कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली तर 90 कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती केली आहे. याशिवाय 435 कर्मचार्‍यांचे निलंबन केले असल्याचे बेलसरे यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाबाबत सोमवारी न्यायालयात सुनावणी; वडेट्टीवार म्हणतात, वेळ वाढवून देण्याची मागणी करणार, कारण काय?

Nagpur Crime | एफआयआर दाखल करणार नाही म्हणून मागितली लाच; रामटेकचा वनपाल कसा अडकला एसीबीच्या जाळ्यात?

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचे तीन बळी, चिंता वाढली; बाधितांमध्ये पोलिसांची संख्या किती?

Published On - 4:56 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI