Nagpur Traffic | नागपुरात गडर लाईनचे काम, नंदनवन-हसनबागमधील रस्त्यांची वाहतूक बंद, मनपा आयुक्तांचे आदेश काय?

मुख्य गडर लाईनचे काम पूर्ण करण्यासाठी नंदनवन पोलीस स्टेशन टी-पॉईंट ते कादरीया चौक हसनबाग पर्यंतची वाहतूक 10 जूनपर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे. मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी हे आदेश दिले आहेत. याबाबत मनपा आयुक्तांनी एक आदेश जारी केलेला आहे.

Nagpur Traffic | नागपुरात गडर लाईनचे काम, नंदनवन-हसनबागमधील रस्त्यांची वाहतूक बंद, मनपा आयुक्तांचे आदेश काय?
नागपूर मनपाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 5:20 AM

नागपूर : नागपूर महापालिकेद्वारे प्रभाग क्रमांक 27 मधील नंदनवन ( Nandanvan) पोलीस स्टेशन टी-पॉईंट ते कादरीया चौक हसनबाग पर्यंत मुख्य गडर लाईन करण्यात येत आहे. त्यामुळे या रोडवरील उजव्या बाजूकडील रास्ता कोणत्याही वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. सदर आदेश 10 जूनपर्यंत अमलात राहील. यादरम्यान डाव्या बाजूने दुतर्फा वाहतूक सुरू राहील. या आदेशाच्या अनुषंगाने शहर वाहतूक पोलिसांनी (City Traffic Police) वाहतूक नियमनाकरिता योग्य ती कार्यवाही/उपाययोजना करण्याच्या सूचना आदेशात देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय काम सुरू असलेल्या ठिकाणी कंत्राटदार व कार्यकारी अभियंत्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली. महत्वाच्या उपाययोजना कराव्यात, असेही आदेश आयुक्तांनी (Commissioner) दिले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक नेमावेत

मुख्य गडर लाईनचे काम पूर्ण करण्यासाठी नंदनवन पोलीस स्टेशन टी-पॉईंट ते कादरीया चौक हसनबाग पर्यंतची वाहतूक 10 जूनपर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे. मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी हे आदेश दिले आहेत. याबाबत मनपा आयुक्तांनी एक आदेश जारी केलेला आहे.काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावून काम सुरू झाल्याची व पूर्ण करण्याची तारीख नमूद करावी. कंत्राटदाराने स्वतःचे नाव व संपर्क क्रमांकाचे फलक लावावे. पर्यायी मार्ग सुरू होण्याच्या व संपण्याच्या ठिकाणी तसेच बॅरिकेड्स जवळ सुरक्षा रक्षक किंवा स्वयंसेवक नेमावे. वाहतूक सुरक्षा रक्षक, वाहतूक चिन्हाचा पाट्या, कोन्स, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, एजईडी बॅटन, ब्लिकर्स आदी संसाधने उपलब्ध करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्तांच्या आदेशात नेमकं काय?

काम सुरू झाल्यानंतर जमिनीतून निघणारी माती, गिट्टी आदी रस्त्यावर टाकू नये. रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ बुजवावे. पर्यायी मार्गाच्या ठिकाणी वळण मार्गाचे सविस्तर माहिती फलक लावावे. रात्रीच्या वेळी एलईडी डायव्हर्शन बोर्ड लावावे. बॅरिकेड्सवर एलईडी माळा लावणे, उजव्या बाजूने दुतर्फा वाहतूक चालणा-या ठिकाणी अस्थायी रस्ता दुभाजक तयार करून एकाच मार्गावरून दुतर्फा वाहतूक वळविणे. वाहतूक नियमांचे तसेच वाहतूक पोलिसांनी दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करणे. रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरिकांच्या सोयीकरीता आवश्यक व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Car Birthday | भंडाऱ्यात मालकाने साजरा केला चक्क कारचा वाढदिवस, 34 वर्षे अविरत सेवा

11th Class Admissions| राज्यात अकरावी प्रवेशासाठी आता वेटिंग लीस्ट, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी बंद

Nagpur ST | आधी एसटी बससमोर नतमस्तक, नंतर लालपरीचं स्टेअरिंग हाती; नागपूर विभागात 327 कर्मचारी रुजू

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.