नागपुरात सफाई मजुरांच्या वारसदारांना तोहफा, महापालिकेतर्फे नोकरीच्या नियुक्तीचे प्रमाणपत्र, किती जणांना लाभ?

| Updated on: Feb 10, 2022 | 4:10 AM

स्वच्छ, सुंदर नागपूर ही शहराची छबी कायम ठेवण्यासाठी सातत्याने सफाई कर्मचारी तत्पर असतात. स्वच्छतेचे सेवाकार्य बजावणाऱ्या 92 वारसदारांना मनपामध्ये स्थायी नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.

नागपुरात सफाई मजुरांच्या वारसदारांना तोहफा, महापालिकेतर्फे नोकरीच्या नियुक्तीचे प्रमाणपत्र, किती जणांना लाभ?
सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देताना महापौर.
Follow us on

नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापौर कक्षात प्रतिकात्मक स्वरूपात सफाई कर्मचाऱ्यांच्या दहा वारसदारांना स्थायी नियुक्तीपत्र दिले. लाड पागे समितीच्या (Lad Paage Committee) शिफारशीनुसार हे प्रमाणपत्र देण्यात आले. अन्य सफाई कर्मचा-यांना संबंधित झोन कार्यालयातून (From the concerned zonal office) स्थायी नियुक्ती पत्र (Permanent appointment letter) प्रदान करण्यात आले. महापौर कक्षामध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव, नगरसेवक धर्मपाल मेश्राम, नगरसेविका नीला हाथीबेड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी गजेंद्र महल्ले, लाड पागे समितीचे इन्चार्ज किशोर मोटघरे आदी उपस्थित होते.

92 पात्र वारसदारांना स्थायी नियुक्तीपत्र

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेतर्फे लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार 92 पात्र वारसदारांना स्थायी नियुक्तीपत्र देण्यात आले. नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर बनवून स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर शहराची रँक वाढविण्यासाठी आपल्या हातून चांगले काम होईल अशी, आशा महापौरांनी यावेळी व्यक्त केली. प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनुसार याच आठवड्यात मनपातर्फे दोनशे लोकांची यादी प्रकाशित केली जाणार आहे. त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत दोनशे लोकांना स्थायी नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

स्थायी नियुक्ती पत्र प्राप्त वारसदार

सोनू शेखर चमके, अक्षय किशोर शिर्के, विपीन निरंजन चौव्हाण, प्रतीक गणेश शामकुवर, पिंकी अमित देवधरे, राणी सुनील बकसरे, प्रिया आकाश मकरंदे, नकुल श्रीधर रामटेके, विजय हरिकिशन कैथेलकर, सुमित दुर्गेश डकाहा, चंद्रभागा शक्ती वाघमारे, समाज गुणवंत तिरपुडे, सुषमा रवी मतेलकर, आकाश कृष्णा पाठक, ममता संतोष शुक्ला, राजश्री राजन त्रिमिले, राहुल अशोक चिचोंडे, धर्मेंद्र विश्वनाथ शेंडे, अंकित फुलचंद नकाशे, प्रीती उमेश बेहुनिया, मिथुन विजय मेश्राम, गौरी कृष्णा गौरे, विशाल ईश्वर तायवाडे, पूजा दुर्योधन मेश्राम, मनीष शंकर वामन, दिनेश गणेश करिहार, सुनीता राजेश कटारिया, शोभा सुधीर खंडारे, संतोष लक्ष्मण मेश्राम, बल्लू मुन्ना डकाहा, आकाश रामलाल सिरमोरीया, रुपेश रवींद्र पाटील, रोहित किशोर गोराडे, प्रफुल्ल विनायक रामटेके, पंकज लक्ष्मण चुटेलकर, पूजा सचिन कळसे, कमल रामदास हाथीबेड आदी.

इतर नियुक्ती पत्र प्राप्त वारसदार

तारा अशोक डकाह, मंगेशकुमार लक्ष्मण गजभिये, आकाश मनोज मस्ते, स्वाती एवीन अंबाला, अनिस रणजित जनवारे, अक्षय सुधीर सहारे, दुर्गेश अशोक सावरकर, सपन अशोक शुक्लवारे, रोहिणी जगन्नाथ करिहार, मोहन रमेश मस्ते, कविता ललित मोहिते, सुशील सुरेंद्र समुन्द्रे, प्रफुल्ल मिलिंद सहारे, राहुल अनिल महाजन, वैशाली सिद्धार्थ ढोके, आतिश सुंदरलाल मलिक, सोनू पृथ्वीराज कोंढावे, श्रीकांत उमेश समुन्द्रे, चंद्रिका अमित डकाह, आकाश प्रीतम बकसरे, रीना राकेश समुन्द्रे. महेश प्रल्हाद समुन्द्रे, आतिश अशोक चव्हाण, निकलेश दीपक मतेलकर, विशाल मनोहर मलिक, आकाश राजू उके, शुभम रमेश फुलझेले, प्रवीण गोविंदा वासनिक, निखिल देविदास गडपायले, निकेश बबली बक्सरे, ज्योती विशाल डाकाह, शीला अजय तांबे, पंकज मुरली गौरे, रीना नरेश राणे, निखिल हिरामण पिल्लेवार, वीरेंद्र विजय शेंद्रे, अजय अमर गहरे, रोहित राजू बेलचक्रे, विवेक प्रतीक नंदेश्वर, रीना अमित डकाह, गौरव अशोक माटे, नरेंद्र सोमा खोब्रागडे, जितेंद्र भाऊदास बर्वे, रीना रामसिंग बिसे, नयन अशोक चौव्हाण, अरविंद दशरथ वाघमारे, दिवाकर दुर्गाप्रसाद कोरी, रिंकू प्रफुल्ल भागवतकर, अमोल प्रल्हाद विरहा, नितीन बल्लू बोयत, दिनेश प्रेमदास उके, अनुराग कृष्णा खरे, निखिल बबन पाटील, मिथुन चुन्नीलाल वाघमारे आणि मनोज चंद्रभान भिमटे.

Spices Price | मिरचीसह मसाल्यांना महागाईचा ठसका, खसखस व लवंगला सोन्याचा भाव…

Nagpur Collector | नागपूर जिल्ह्यात आज फेरफार अदालत; कुठे करता येणार शेती-मालमत्तेची फेरफार?

मॅनेजर बायकोच्या चारित्र्यावर संशय, खुनाच्या इराद्याने ऑफिस गाठलं, चाकू हल्ल्यात बॉस गंभीर